शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

महिलांवरील हिंसाचाराबाबत गप्प का?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2019 5:57 AM

फ्लेव्हिया अ‍ॅग्नेस; अंजनी माशेलकर प्रेरणा पुरस्काराने सन्मानित

पुणे : बलात्काऱ्यांना फाशी देऊन, एन्काउंटर करून पीडितेला तात्काळ न्याय देण्याची मागणी केली जाते. पण महिलांवर दररोज होत असलेल्या अत्याचाराविरोधात कोणीच बोलत नाही. महिला हिंसाचारविरोधात असलेल्या कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी कोणीच पुढे येत नाही. त्यासाठी लढा उभारण्याचे स्वयंसेवी संस्थांचे काम नाही. शासनासह प्रत्येकाने यामध्ये सक्रियता दाखवायला हवी, अशी अपेक्षा महिलांच्या हक्कांसाठी लढणाºया सामाजिक कार्यकर्त्या फ्लेव्हिया अ‍ॅग्नेस यांनी व्यक्त केली.

‘द इंटरनॅशनल लाँजिव्हिटी सेंटर इंडिया’(आयएलसीआय) यांच्या वतीने शनिवारी अ‍ॅग्नेस यांना पहिल्या अंजनी माशेलकर प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी ज्येष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती, ‘आयएलसीआय’चे अध्यक्ष व ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर व चेअरमन जयंत उमराणीकर, कार्यकारी संचालिका अंजली राजे आदी उपस्थित होते. याप्रसंगी कै. श्री. बी. जी. देशमुख पुरस्काराने मिरज येथील आधार ज्येष्ठ नागरिक संस्था, ज्येष्ठ नागरिक संघ डीएसके विश्व पुणे, आणि रत्नागिरी येथील कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघाचा गौरव करण्यात आला. तर वर्धा येथील डॉ. नामदेवराव बेहरे, बारामती येथील डॉ. पांडुरंग बोराटे आणि पुण्यातील डॉ. प्रमोद मोघे यांना कै. श्री. बी.जी. देशमुख जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.

अ‍ॅग्नेस म्हणाल्या, हुंडाबळी, बलात्कार, गर्भपात यांसह महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना पुढे येत आहेत. हैदराबाद येथे बलात्कार करून तरूणीला जाळण्यात आले. या प्रकरणात आरोपींचे एन्काउंटर करण्यात आले. असाच तात्काळ न्याय लोकांना हवा आहे. पण फिर्याद नोंदविताना ठेवलेल्या त्रुटी, न्यायदानात होणारा विलंब, आरोपीच्या वकिलांच्या प्रश्नांची उत्तरे देताना पीडितेची होणारी घुसमट याविषयी बोलले जात नाही. हे मुद्दे संघटनेच्या पातळीवर उचलून धरण्यात आले. त्यामध्ये यशही मिळत आहे. त्या कामाचा सन्मान होत असल्याने समाधान वाटते.‘इंटरनॅशनल लॉन्जिव्हिटी सेंटर-इंडिया (आयएलसी-आय) या संस्थेचे पुरस्कार शनिवारी प्रदान करण्यात आले. यात महिला अधिकारांसंदर्भात काम करणाºया कार्यकर्त्या फ्लॅव्हिया अ‍ॅग्नेस यांना ‘अंजनी माशेलकर प्रेरणा पुरस्कारा’ने जयंत उमराणीकर, डॉ. के. एच. संचेती, डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.