शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

सभोवताली इंद्रधनुष्याचे रंग असताना कायम तक्रार करत का जगायचं ?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 9:56 PM

कुठल्या एका सार्वजनिक स्वच्छतागृहात आम्हाला जाऊ द्या. अद्याप नजरा काही बदलल्या नाहीत...

ठळक मुद्देएलजीबीटी समुहातील व्यक्तींच्या भावना डिव्हाईन डिवा कार्यक्रमातून दिले सामाजिक जाणीवांना शब्दरुप

पुणे : आपण कसेही असलो, वागलो तरीही समाज नावे ठेवायचा बंद होणार नाही. त्याला दरवेळी उत्तरे देऊन स्वत:तील उर्जा आणि सर्जनशीलता संंपविण्यापेक्षा त्याचा सकारात्मक उपयोग होणे गरजेचे आहे. आपल्या सभोवताली सगळे मळभ दाटून आले असून त्याच्या परिणामाला आपल्याला सामोरे जावे लागणार या भीतीत किती दिवस राहायचे? सातत्याने तक्रार करत जगण्यापेक्षा हिंमतीने आणि आत्मविश्वासाने तोंड देणे जास्त गरजेचे आहे. या शब्दांत एलजीबीटी समुहातील व्यक्तींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.  लोकमतच्या सहकायार्ने  इनसाईड आऊट या संवादात्मक कार्यक्रमाचे आयोजन क्राऊन प्लाझा येथे करण्यात आले होते. याप्रसंगी समपथिक ट्रस्टचे संस्थापक अनिल, बिंदुमाधव खिरे, श्रध्दा (क्वीर), त्रिनय (ट्रान्समँन), विजय आणि पायल (ट्रान्सवुमन) उपस्थित होते. याबरोबरच निवृत्त पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गे यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. डिव्हाईन डिवा क्लब हा महिलांचा क्लब चार वर्षांपूर्वी सुरु झाला. भावना मयुर, अंजली लोढा, रिटा गांधी, कोयल मुथा, तेजल शहा, रुपाली जैन, प्रीती सोळंकी, नुपूर पिल्ले आणि गायत्री मंत्री यांनी हा क्लब स्थापन केला आहे. एलजीबीटी समुहाविषयीचे समाजातील गैरसमज दूर व्हावेत याकरिता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खिरे यांनी मनोगतातून कलम 377 कडे सर्वांचे लक्ष वेधून त्यातील बारकावे उपस्थितांना समजावून सांगितले. तसेच भविष्यात समलैंगिकांकरिता कायद्यात विशेष तरतुद गरजेचे असून कायद्यापुढे कुठल्याही प्रकारचा लिंगभेदभाव करता कामा नये. असे मत त्यांनी व्यक्त केले. आपण कुणी वेगळे आहोत अशी ओळख दाखविण्याची सुरुवात समाजातून सुरु होते. हाच समाज आपल्याला वेगळी ओळख देतो. त्याच्या सोयीनुसार एकाच चष्मातून आमच्याकडे पाहतो. अशावेळी आम्ही कोण आहोत, आमची वेदना जगणे काय आहे, आम्हाला काय हवे आहे, असे प्रश्न त्याला पडत नाहीत. म्हणून त्याच्याबद्द्ल तक्रार करत राहण्याचा उपयोग नाही. अशी परखडता तेजल यांनी व्यक्त केली. भवतालचे जग वेगाने बदलत असताना अद्याप त्याकडे धर्म, संस्कृती, परंपरा यांच्या दृष्टीकोनातून पाहणाºयांची संख्या कमी झालेली नाही. त्यांच्या जगण्यात, वागण्यात म्हणावी अशी लवचिकता आलेली नसल्याने समलैंगिक व्यक्तींकडे त्यांची पाहण्याची नजर प्रश्नार्थकच आहे. तरी देखील स्वबळावर स्वतमधील कार्यशीलता वाढवून वेगळे स्थान निर्माण करण्यावर भर देणे गरजेचे आहे. असे गायत्री मंत्री म्हणाल्या. बर्गे म्हणाले, पोलीसांकडून एलजीबीटीच्या समुहातील कुणाला त्रास दिला जातो. असे म्हणणे चुकीचे आहे. मुळात पोलिसांकडून त्यांना कुठल्याही प्रकारचा धोका नाही. मुळात आपण सर्वांनी मिळुन त्यांना समाजातील त्यांचे हक्क मिळवून देण्याकरिता एकत्र येण्याची गरज आहे. 

 * कुठल्या एका सार्वजनिक स्वच्छतागृहात आम्हाला जाऊ द्या. अद्याप नजरा काही बदलल्या नाहीत. विचार देखील नाहीत. तृतीयपंथीय समाजाविषयी लोकांमध्ये बुरसटलेल्या भावना आहेत. इतर नागरिकांप्रमाणेच आम्हाला देखील सार्वजनिक स्वच्छतागृह वापरु देण्याचा अधिकार मिळावा. तो मिळत नाही. याशिवाय शिक्षण आणि आरोग्यविषयक सुविधांचा आमच्याही उपयोगी पडाव्यात. या शब्दांत पायल हिने आपल्या भावनांना शब्दरुप दिले.  

टॅग्स :PuneपुणेLGBTएलजीबीटी