बिर्याणीसाठी पैसे कशाला द्यायचे? या पोलीस कर्मचाऱ्याच्या ऑडिओ क्लिपवर गृहमंत्री म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 01:11 PM2021-07-30T13:11:27+5:302021-07-30T13:11:36+5:30

पुणे पोलीस दलात सध्या एका ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल

Why pay for biryani? On the audio clip of this police officer, the Home Minister said ... | बिर्याणीसाठी पैसे कशाला द्यायचे? या पोलीस कर्मचाऱ्याच्या ऑडिओ क्लिपवर गृहमंत्री म्हणाले...

बिर्याणीसाठी पैसे कशाला द्यायचे? या पोलीस कर्मचाऱ्याच्या ऑडिओ क्लिपवर गृहमंत्री म्हणाले...

googlenewsNext
ठळक मुद्देपोलीस आयुक्तांना अहवाल सादर करण्यास सांगितला असून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश

पुणे : पुणे पोलीस दलातील कर्मचाऱ्याची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. त्यामुळे पोलीस दलात सर्वत्र चर्चा रंगली आहे. या प्रकरणाची गृहमंत्र्यांनी दखल घेतली आहे. दिलीप वळसे पाटील म्हणाले, “या प्रकरणाची ऑडिओ क्लिप मी ऐकली आहे. हे प्रकरण गंभीर आहे. त्यावर पोलीस आयुक्तांना अहवाल सादर करण्यास सांगितला असून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.  

पुणे पोलीस दलात सध्या एका ऑडिओ क्लिपमुळे खळबळ माजली आहे. यामध्ये पुणे पोलीस दलातील महिला अधिकारी कर्मचाऱ्याला जेवणाची ऑर्डर देताना हॉटेलवाल्याला बिलाचे पैसे देण्याची काय गरज आहे? अशी विचारणा करताना दिसत आहे. या ऑडिओ क्लिपबाबत पुणे पोलिसांकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

ऑडिओ क्लिपमध्ये काय संभाषण झालं आहे 

पोलीस उपायुक्त असणाऱ्या या महिला अधिकारी कर्मचाऱ्याला विश्रामबागच्या इथे नॉनव्हेज खूप चांगलं मिळतं असं ती म्हणत होती सांगत कुठे अशी विचारणा करतात. यावर पोलीस कर्मचारी एसपी बिर्याणीची साजूक तुपातली बिर्याणी, कोल्हापूरची मटण थाली असं सांगतो. यावर महिला अधिकरी जास्त चांगली कुठे आहे असं विचारल्यानंतर कर्मचारी त्यांना साजूक तुपातली, त्यांच्याकडे दोन दोन प्रकार आहेत..नल्ली निहारी म्हणून एक प्रकार आहे असं सांगतो. तसंच ऑईली बिलकूल नाही आणि साजूक तुपातली पण चांगली आहे. कलर वगैरे नसतं त्यात असंही सांगतो.

यावर महिला अधिकारी बरं जी एक चांगली असेल ती पाठवून द्याल सोनावणेकडे. जर काय याचा इश्यू असेल तर पीआयला सांगून द्या मॅडमनं सांगितलं म्हणून. मी बोलू का पीआयला असं विचारतात. यावर कर्मचारी नाही मॅडम करतो मी असं सांगतो. “त्याच्या हद्दीतलं आहे तर पैसे कशाला द्यायचे आपण..आपल्या हद्दीमध्ये पण पैसे द्यायचे का आपण?,” अशी विचारणा महिला अधिकारी करते.

“आपण यापूर्वी असं कधी केलं नव्हतं त्यांना..ठीक आहे मॅडम मी सांगतो..पीआयशी बोलतो आणि हे करून घेतो,” असं पोलीस कर्मचारी सांगतो. यावर महिला अधिकारी मग तुम्ही काय करायचे? असं विचारतात. त्यावर पोलीस कर्मचारी आपण कॅशच करायचो मॅडम असं सांगतो.

“तेवढं करेल तो..त्यादिवशी मला बोलत होता एक हॉटेल आहे म्हणून…तेवढं करेल तो..त्याच्यात काय एवढं? नाहीतर दुसरं कोणी असेल..किंवा मी सांगते,” असं महिला अधिकारी यावेळी त्या कर्मचाऱ्याला सांगते. यानंतर पोलीस कर्मचारी येस मॅडम. मी सांगतो असं उत्तर देतो.

ऑडिओ क्लिपच्या शेवटी महिला अधिकारी म्हणतात की, “त्यादिवशी मला बोलला तो..आम्ही तिथे फिरत होतोना तर मला बोलला..पण आपल्या हद्दीत आहे तर त्यासाठी का पैसे पे करायचे..आपल्या हद्दीतल्या गोष्टीसाठी कोणी पैसे पे करतं का?..मला माहीत नाही”.

Web Title: Why pay for biryani? On the audio clip of this police officer, the Home Minister said ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.