पुणे: विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या अपात्रतेसंदर्भातील निकालानंतर हा निकाल कसा लोकशाहीविरोधी आहे, हे पटवून देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील वरळी डोम येथे पत्रकार परिषद घेतली. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी भाजप युती पासूनच्या सर्वच मुद्द्यांना हात घालत भाजपवर टीका केली आहे. पाठिंब्यासाठी भाजपने मला का बोलावले? असा सवाल उपस्थित ठाकरे यांनी उपस्थित केला होता.
आमची १९९९ ची घटना शेवटची होती, तर २०१४ आणि २०१९ ला मोदींना पाठिंबा देण्यासाठी का मला बोलाविले? त्यावेळी अमित शाह माझ्याकडे आले असल्याचा खुलासा ठाकरे यांनी महापत्रकार परिषदेत केला होता. यावरून सत्तार यांनी सवाल उपस्थित केला आहे. उद्धव ठाकरेंनी युती का तोडली याच उत्तर द्यावं असं सत्तार म्हणाले आहेत.
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आरोपात तथ्य नाही. आता पक्षप्रमुख म्हणून बाळासाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री, आम्ही दैवत मानतो. पण उद्धव ठाकरे संभ्रम निर्माण करत आहेत. आता हे सुप्रीम कोर्टात जाणार, पण कोर्ट आम्हाला न्याय देईल असेही सत्तार यांनी यावेळी सांगितले आहे.
उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलेले २ सवाल
१)आयोगाला हे मान्य आहे काय? : २०२२ मध्ये भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा म्हणाले होते की, या देशात फक्त एकच पक्ष राहणार तो म्हणजे भाजपा. हीच या कटाची सुरूवात होती. ईडी, सीबीआय, लवाद हे सगळे एकत्र आले. शिवसेना, राष्ट्रवादी संपवायचा प्रयत्न केला. निवडणूक आयोगाला हे मान्य आहे का?
२)...तर मला पाठिंब्यासाठी का बोलावले? : आमची १९९९ ची घटना शेवटची होती, तर २०१४ आणि २०१९ ला मोदींना पाठिंबा देण्यासाठी का मला बोलाविले? त्यावेळी अमित शाह माझ्याकडे आले होते. काही चर्चा झालीच नाही म्हणतात, मग माझ्याकडे का आले होते? १९९९ ला जर आमचे अधिकार थांबले, मग या सगळ्यांना एबी फॉर्म, मंत्रिपदे कोणी दिली?