शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
3
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
4
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
5
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
6
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
7
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
8
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
9
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
10
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
11
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
12
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
13
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
14
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
15
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
16
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
17
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
18
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न

उच्च शिक्षण विभाग उशिरा जागा का झाला?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 12:06 PM

तब्बल २१ वर्षांनी उच्च शिक्षण विभागाने त्याच कर्मचाऱ्यांकडे वसुली दाखवणे चुकीचे आहे...

ठळक मुद्देप्राध्यापक संघटना : सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्तिवेतन मंजूरसंबंधित प्राध्यापकांनी महाविद्यालयात काम केल्याचे कोणीही नाकारत नाही.

पुणे : पुणे विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयाने खडकी येथील टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पाचव्या व सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम निश्चित केली. तसेच सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे निवृत्तीवेतन मंजूर केले. त्यानंतर तब्बल २१ वर्षांनी उच्च शिक्षण विभागाने त्याच कर्मचाऱ्यांकडे वसुली दाखवणे चुकीचे आहे. उच्च शिक्षण विभाग एवढ्या उशिरा जागा का झाला? असा सवाल प्राध्यापक संघटनेकडून उपस्थित केला जात आहे.खडकी शिक्षण संस्थेच्या टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीमध्ये अनियमितता झाल्याचे सांगत पुणे विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयाने महाविद्यालयाकडे ६ कोटी ८१ लाखांची वसुली दाखवली आहे. मात्र, एखाद्या संस्थेच्या प्राध्यापकांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांच्याकडून वसूली दाखवणे योग्य नाही. शिक्षण विभागाकडून प्राध्यापकांवर अन्याय केला जात आहे, असे एम. फुक्टो संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. एम. फुक्टोचे सचिव प्रा. एस. पी. लवांडे म्हणाले, संबंधित प्राध्यापकांनी महाविद्यालयात काम केल्याचे कोणीही नाकारत नाही. प्राध्यापकांनी केलेल्या कामाचा मोबदला म्हणून त्यांना वेतन दिले आहे. तसेच शासनाकडून संस्थेला वेतन अनुदान दिले जाते. त्यातून प्राध्यापकांचे पगार केले जातात. शासनाला वसूली करायचीच असेल तर ती संस्थेकडून करणे उचित ठरेल प्राध्यापकांकडून वसुली करू नये. त्याचप्रमाणे पाच वर्षानंतर कोणत्याही व्यक्तीला अदा केलेल्या वेतनाची वसुली करता येत नाही. तसेच त्यांचे वेतन थांबविणेही योग्य नाही..........

केवळ आठच कर्मचाऱ्यांचे वेतन का थांबविले ?उच्च शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, केवळ आठ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन थांबविले आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांचे वेतन थांबविलेले नाही. मात्र, महाविद्यालयातील प्राध्यापक नियुक्तीत अनियमितता झाली असल्यामुळे वसुली दाखविली जात असेल, तर केवळ आठच कर्मचाऱ्यांचे वेतन का थांबविले? च्उर्वरित कर्मचाऱ्यांचे वेतन का थांबविले नाही? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

..........

विद्यापीठातील व शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी त्या-त्या वेळी आवश्यक कागदपत्रे तपासून घेणे आवश्यक आहे. वेतन मान्यता देण्यास संबंधित अधिकारी जबाबदार असतो. त्यामुळे शासकीय अधिकाऱ्यांना जबाबदार धरावे की नाही, याबाबत विचार करण्याची आवश्यकता आहे.- प्रा. नंदकुमार निकम, अध्यक्ष, प्राचार्य संघटना .......विद्यापीठातील व शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी त्या-त्या वेळी आवश्यक कागदपत्रे तपासून घेणे आवश्यक आहे. वेतन मान्यता देण्यास संबंधित अधिकारी जबाबदार असतो. त्यामुळे शासकीय अधिकाऱ्यांना जबाबदार धरावे की नाही, याबाबत विचार करण्याची आवश्यकता आहे.- प्रा. नंदकुमार निकम, अध्यक्ष, प्राचार्य संघटना ..............

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणuniversityविद्यापीठcollegeमहाविद्यालय