शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : आज मतदार सत्ताधारी, राज्यात ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य ‘ईव्हीएम’मध्ये बंद होणार!
2
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
3
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
4
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
6
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
7
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
8
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
9
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
10
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
11
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
12
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
13
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
14
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
15
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
16
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
17
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
18
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
19
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
20
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल

दुर्जनांना काठी आणि सज्जनांना गुलाब

By admin | Published: January 08, 2017 3:26 AM

एका हातामध्ये काठी आणि दुसऱ्या हातामध्ये गुलाब घेऊन आपण काम करणार असून, दुर्जनांना कायद्याने धडा शिकवण्यात येईल. आपल्या कामाची पद्धत ‘3जे’वर आधारलेली

पुणे : एका हातामध्ये काठी आणि दुसऱ्या हातामध्ये गुलाब घेऊन आपण काम करणार असून, दुर्जनांना कायद्याने धडा शिकवण्यात येईल. आपल्या कामाची पद्धत ‘3जे’वर आधारलेली असणार आहे. त्यामध्ये जवान अर्थात पोलीस, जनता आणि जुर्म (गुन्हे) यांचा समावेश असून आगामी काळात संपूर्ण जिल्हा पिंजून काढून कामाचे नियोजन आणि ‘व्हिजन’ तयार करणार असल्याची माहिती नवनियुक्त अधीक्षक सुवेझ हक यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.हक यांनी शुक्रवारी पुणे ग्रामीण पोलीस दलाची सूत्रे स्वीकारली. त्यांनतर शनिवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पोलीस ठाणे ही पोलीस दलातील पायाभूत गोष्ट आहे. लोकांना पोलीस ठाणेस्तरावरच जर न्याय मिळाला तर त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जाण्याची आवश्यकता पडणार नाही. त्यामुळे कामातील सुधारणा घडवून आणण्यावर भर देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पोलीस दलाचा कणा असलेल्या जवान म्हणजेच कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढवणे, त्यांना व्यवस्थित प्रशिक्षण देणे, त्यांच्यासाठी कल्याणकारी योजना राबवणे, कामासाठी प्रोत्साहित करणे अशी कामे केली जाणार आहेत. यासोबतच जनतेच्या समस्या जाणून घेत त्यांना वेळेत मदत देणे, जनतेशी पोलीस दलाला जोडून घेणे, सुरक्षित समाज देणे ही पोलिसांची जबाबदारी आहे. गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्यात येईल. मुले आणि महिलांची सुरक्षा, मागास घटक, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. पोलीस दलाच्या ‘शो’चा खरा हिरो पोलीस कर्मचारी आहे. त्यामुळे अधीक्षक असलो तरी आपण ‘बॅक स्टेज’ला राहून काम करणार असल्याचेही हक म्हणाले.गडचिरोलीमध्ये केलेल्या कामाचा अनुभव सर्वात उत्तम होता. त्याठिकाणी राबवलेल्या नवजीवन योजना, ग्राम भेट योजना, जनजागरण मेळावे, आपला महाराष्ट्र अशा योजना यशस्वी ठरल्या. पुणे जिल्ह्यातील चाकण, तळेगाव, रांजणगाव आदी सर्वच ठिकाणांवरील एमआयडीसी आणि उद्योजकांना संरक्षण देऊ. त्यांच्या समस्या सोडवण्याचा व खंडणीखोरांना त्यांची जागा दाखवून देऊ, असेही हक यांनी ठणकावून सांगितले. असे प्रयोग यापूर्वी पालघर, रायगड जिल्ह्यांत राबवल्याची आठवणही त्यांनी सांगितली. चमकदार कामगिरी : विविध पारितोषिकांचे मानकरीमोहंमद सुवेझ हक हे २००५ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी नाशिक आणि बीडमध्ये सहायक अधीक्षक, सोलापूरला अतिरिक्त अधीक्षक, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, पालघर, रायगड जिल्ह्यांमध्ये अधीक्षक म्हणून कामगिरी बजावलेली आहे. त्यांची पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या अधीक्षकपदी नेमणूक झाली आहे. त्यांना महासंचालक पदक, विशेष सेवा पदक, अंतरिक सुरक्षा सेवा पदक, बेस्ट इलेक्ट्रोल प्रॅक्टिस अवॉर्ड, पोलीस गॅलेंट्री पुरस्कारही मिळालेले आहेत.शहीद अशोक कामठे हे माझे आदर्श आहेत. पोलीस दलाच्या कामामध्ये आपण त्यांची ‘फिलोसॉफी’ मानत असल्याचे सुवेझ हक म्हणाले. त्यांची आठवण सांगताना ‘पोलिसांच्या एका हातात काठी आणि एका हातात गुलाब आहे. समोरच्याला आपल्याला काय हवे हे ठरवायचे. गुन्हेगारांना काठी आणि नागरिकांना गुलाब.’ या कामठेंच्या तत्त्वानेच काम करणार असल्याचे सांगत त्यांनी आगामी काळातील कामाची दिशाच स्पष्ट केली.- सुवेझ हक, अधिक्षक