भिगवण : दोन दिवसांपूर्वी पत्नीचा मृत्यू झाल्याने नैराश्यात गेलेल्या पतीने गळफास घेवून जीवनयात्रा संपवल्याची दुःखद घटना मदनवाडी (ता. इंदापूर) येथे घडली.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मदनवाडी येथील श्रावणी गोपाळ सुतार (वय.२०) यांचे डेंग्यूच्या आजारामुळे शुक्रवारी (दि,२७) निधन झाले होते. या दुःखद घटनेतून सावरत असतानाच श्रावणी यांचा पती गोपाळ उर्फ स्वप्नील प्रदीप सुतार (वय २४) यांनी रविवार (दि,२९) रोजी दुपारी घरी बसले होते. त्यावेळी मला कंटाळा आलाय मी जरा आराम करतो असे सांगून एका खोलीत गेले. त्या खोलीच्या छताला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेवून जीवनयात्रा संपवली, याबाबतची फिर्याद गोपाळ यांचा भाऊ संतोष सुतार यांनी भिगवण पोलिसांना खबर दिली. या घटनेमुळे श्रावणी आणि गोपाळ यांची ७ महिन्यांची उर्वा हि चिमुकली पोरकी झाली. गोपाळची भिगवण येथे मोबाईल शॉपीचे दुकान होते. या दुखत घटनेमुळे भिगवण व मदनवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.