पिंपरी : दारू पिण्यासाठी विरोध करणाऱ्या पत्नीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह मोशीतील एका डोंगरावर झाडीत टाकून दिला. ही घटना रात्री आठच्या सुमारास घडली असून एमआयडीसी भोसरी पोलिसांनी पतीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस उपनिरीक्षक रुपाली पाटील यांनी या ,प्रकरणी फिर्याद दिली आहे. पिंकी संतोष सप्रे (वय २७) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.त्यानुसार संतोष नेमुराम सप्रे (वय ३२, रा. बाकी, सोनपुरी, जि. मुंगेली, छत्तीसगड) या पतीला अटक केली आहे. आरोपी संतोष मूळ छत्तीसगड येथील असून कामाच्या निमित्ताने तो पुण्यात आला आहे. त्याला दारूचे व्यसन असून त्याला दारू पिण्यासाठी पत्नी पिंकी विरोध करत असे. या कारणांवरून संतोषने पिंकीला मोशी येथील शुभलक्ष्मी मार्बल अँड ग्रॅनाईट दुकानाच्या मागे असलेल्या डोंगरावर नेले. तिथे तिचा गळा दाबून खून केला. खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी पिंकीचे प्रेत ओढत नेवून डोंगरावरील झुडुपात टाकून दिले. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. याचा तात्काळ तपास करत पोलिसांनी आरोपीला शोधून अटक केली आणि खुनाचा गुन्हा दाखल केला.
दारू पिण्यास विरोध केल्याने पतीकडून पत्नीचा खून
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 4:11 PM