शहरं
Join us  
Trending Stories
1
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
2
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
3
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
4
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
5
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
6
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
7
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
8
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
9
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
10
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
11
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
12
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
13
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
14
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
15
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
16
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 
17
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
18
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
19
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
20
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत

‘पत्नी पांढऱ्या पायांची, पैशांचा पाऊस पाडतो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 4:12 AM

पुणे : तुमची पत्नी पांढऱ्या पायाची असल्याचे सांगून करणी करणे, पैशांचा पाऊस पाडून देतो, विशिष्ट अंगारा लावला तर ...

पुणे : तुमची पत्नी पांढऱ्या पायाची असल्याचे सांगून करणी करणे, पैशांचा पाऊस पाडून देतो, विशिष्ट अंगारा लावला तर पुत्रप्राप्ती होईल, गुप्तधन, नरबळी, नग्नपूजा, लैंगिक शोषण अशा बुवाबाजी विरोधात जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत राज्यात आत्तापर्यंत ६५० गुन्हे दाखल आहेत. पुणे जिल्ह्यात ही संख्या जवळपास ऐंशीच्या आसपास आहे. न्यायालयात यातल्या जवळपास तीस खटल्यांचा निकाल लागला असून, दोषींना शिक्षा देखील झाली आहे. तरीही, कायद्याबाबत अद्यापही म्हणावे तितके समाजप्रबोधन नसल्यामुळे तक्रार दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सातत्याने बुवाबाजी, मांत्रिकांकरवी होणारे अघोरी प्रकार, असाध्य रोग बरे करण्यासाठी दिली जाणारे आव्हाने याविरूद्ध आवाज उठवत आहे. समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या खुनानंतर २६ ऑगस्ट २०१३ रोजी तत्कालीन सरकारने जादूटोणा विरोधी विधेयक मंजूर केले. या कायद्याबाबत अंनिस व अन्य संघटना प्रसार करत असतात. भानामती, नरबळी, चमत्काराचा दावा करून महिला व मुलींचे लैंगिक शोषण करणे, जादूटोणा, भूत उतरविण्याच्या बहाण्याने अंगाला चटके देणे, पैशांचा पाऊस पाडून देण्यासाठी आर्थिक फसवणूक करणे, पूजेला विवस्त्र बसण्यासाठी महिलांना जबरदस्ती करणे आदी विविध घटनांविरोधात जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत राज्यात गुन्हे दाखल असल्याचे अंनिसचे राज्य प्रधान सचिव मिलिंद देशमुख यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

पुण्यात विश्रांतवाडी येथे पहिला गुन्हा दाखल झाला होता. कोंढव्यात एकाला सहा लाखांची कबुतरे घ्यायला लावून माणसाचे सर्व आजार कबुतरामध्ये जातील असे सांगण्यात आले होते. पत्रिका पाहून रत्न देणे, पिंपरीमध्ये नेहरूननगर मध्ये महिलेला मुलगा होत नाही म्हणून कुटुंबातील मुलींचे लैंगिक शोषण करणे, अशाही घटना पुण्यात उघडकीस आल्या. या विरोधात अंनिसने पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केले. तक्रारदारालाही अंनिस सहकार्य करते, गुन्ह्याचा पाठपुरावा करते असे देशमुख म्हणाले.

चौकट

येमूलविरुद्ध हवा ‘हा’ गुन्हा

“पांढऱ्या पायाची असल्याचे सांगून मानसिक छळ करणे हा जादूटोणाविरोधी कायद्याच्या कलम ६ नुसार गुन्हा आहे. मात्र, पोलिसांकडून जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला जात नाही. कथित आध्यात्मिक गुरू रघुनाथ येमूल विरोधात गुन्हा दाखल केल्याबद्दल पोलिसांचे कौतुक आहे, पण त्यांनी जादूटोणाविरोधी कायद्याचे कलम समाविष्ट केले नाही. मंगळवारी (दि. १३) चतु:श्रृंगी पोलिसांना येमूलवर जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे पत्र देणार आहोत. या कायद्याची अंमलबजावणी महत्त्वाची आहे.

-नंदिनी जाधव, कार्याध्यक्ष महाराष्ट्र अंनिस पुणे जिल्हा

चौकट

“अपशकुनी, पांढऱ्या पायाची आहे, तिची जन्मवेळ चुकीची आहे असे सांगून तिच्याविरोधात जादूटोण्याचे प्रकार करायला लावले ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यासाठी कारणीभूत रघुनाथ येमूल याचा अंनिसतर्फे निषेध आहे. त्याच्यावर जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत कडक कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे.

- प्रशांत पोतदार, अंनिस बुवाबाजी संघर्ष विभाग

चौकट

बोगस बुवा आणि त्यांची काही प्रकरणे

* आसवली (ता. खंडाळा. जि सातारा) येथील उदयनाथ महाराजांनी असाध्य रोगावर उपचार करण्याच्या आमिषाने अनेकांची फसवणूक केली. महाराष्ट्र अंनिसमुळे महाराजांची भोंदूगिरी समोर आली.

* कुशीरे (ता.पन्हाळा, जि.कोल्हापूर) गुरव बंधूंनी डोळ्यांच्या सर्व उपचारांवर झाडपाल्याचे रामबाण औषध देतो असे सांगून लोकांना फसविले.

* शेषराव महाराज यांनी आपल्यात दारू सोडविण्याची अद्भुत शक्ती आहे असे सांगून लाखो लोकांना गंडविले.

* प्रसिद्ध आध्यात्मिक गुरू आसाराम बापू यांची मुलीच्या केलेल्या लैंगिक शोषणाबाबत कारागृहात रवानगी करण्यात आली.

* पुण्यातीरघुनाथ येमूल याने प्रतिष्ठित कुटुंबाला सुनेचा छळ करण्यास प्रवृत्ती केल्याप्रकरणी अटक.

--------------------------------------------------------------------------------------------