पुणे: कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालय या एकाच ठिकाणी वन्यजीवांवर उपचार करण्याची सुविधा आहे. त्यामुळे वन विभागाने बावधन येथे वन्य जीवांसाठी अनाथालय उभारण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला आहे. तसेच या प्रकल्प उभारणीसाठी लागणा-या गोष्टींचा अभ्यास करून त्यावरील अहवाल तयार करण्यासाठी तज्ज्ञ समितीची स्थापना केली आहे. या अनाथालयामध्ये जखमी झालेल्या वन्य प्राणी व पक्षांवर उपचार केले जाणार आहेत. जिल्ह्यात भीमाशंकर सारखे मोठे अभयारण्य असून पुणे जिल्ह्यात शेकरू,बिबट्या,वानर,माकड,कोल्हा,लांडगा हरिण,काळवीट,आदी वन्य प्राणी अढळून येतात. तसेच शहरात व इतर परिसरात विविध वन्य पक्षी आढळून येतात. काही कारणास्तव हे वन्य प्राणी जखमी होतात. तसेच आजारी पडतात. त्यामुळे त्यांच्यावर योग्यवेळी उपचार करणे आवश्यक असते. मात्र, जिल्ह्यात केवळ कात्रज येथील प्राणी संग्रहालय या एकाच ठिकाणी प्राण्यांवर उपचार करणारी सक्षम यंत्रणा उपलब्ध आहे. तसेच तज्ज्ञ डॉक्टरांचा गट कार्यरत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून या ठिकाणी जखमी वन्य प्राणी उपचारासाठी आणले जातात. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून कात्रज उद्यान चालवण्यासाठी लागणारा निधी कमी पडत आहेत. प्राणीसंग्रहालयातील वन्य पक्षी व प्राण्याची संख्या आणि त्यांच्यावर होणारा खर्च दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यात संग्रहालयात वन विभागाकडून जखमी वन्य प्राणी उपचारासाठी दाखल केले जातात. रात्री दोन वाजता पाठविण्यात आलेल्या वन्य प्राण्यांवरही येथे उपचार केले जातात.परंतु, वन विभागाने आता स्वत:चे वन्यजीव अनाथालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचा प्रस्ताव सुमारे दोन महिन्यांपूर्वी केंद्र शासनाकडे पाठविला आहे. मात्र,अद्याप या प्रस्तावास मंजूरी मिळालेली नाही...............................किरकोळ जखमी वन्य पशु,पक्षांवर स्थानिक पशु वैद्यकीय अधिकारी उपचार करतात.मात्र,वन विभागातर्फे गंभीर जमखी वन्य प्राणी व पक्षांसाठी वन्यजीव अनाथालय सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. बावधान येथील 9 एकर जागेत हे अन्याथाल सुरू करण्याचे प्रस्तावित असून त्यासंदर्भातील अभ्यासपूर्ण अहवाल तयार केला जात आहे. वन्यजीव क्षेत्रात काम करणारे अधिकारी व स्वयंसेवी संस्थांचे तज्ज्ञ अभ्यासक याबाबत प्रस्ताव तयार करत आहेत. त्यामुळे जखमी झालेल्या वन्य प्राणी व पक्षांवर उपचार करून त्यांना पुन्हा सोडून दिले जाणार आहे. व्ही.एम.भावसार, वन विभागाचे अधिकारी
वन्यजीव अनाथालय मंजूरीच्या प्रतिक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 10:08 PM
जिल्ह्यात केवळ कात्रज येथील प्राणी संग्रहालय या एकाच ठिकाणी प्राण्यांवर उपचार करणारी सक्षम यंत्रणा उपलब्ध आहे. तसेच तज्ज्ञ डॉक्टरांचा गट कार्यरत आहे.
ठळक मुद्देदोन महिन्यांपूर्वी केंद्र शासनाकडे पाठविला प्रस्ताव