रांजणगाव सांडस - मुळा-मुठा व भीमा नदीचा संगम हा शिरूर-दौंड तालुक्यातील रांजणगाव सांडस वाळकी बेट भागात झालेला आहे. पारगाव येथे पाणी अडविण्यासाठी बंधारे बांधले आहेत.या बंधाºयाच्या पाण्याच्या फुगवट्यामुळे दौंड शिरूर तालुक्यातील अनेक गावांच्या शेतीला मुबलक पाण्याची सोय झालेली आहे. त्यामुळे नदीकाठच्या भागत ऊसशेती मोठ्या प्रमाणात झालेली आहे. पावसाळ्यात या बंधाºयाच्या प्लेटा काढल्या जातात दिवाळीनंतर या प्लेटा टाकण्याचे काम चालू होते. प्लेटा टाकल्या की नदीत सोडलेले रसायनयुक्त पाणी नदीला दूषित करीत आहे. त्यामुळे जलपर्णींची वाढही झपाट्याने होते. प्लेटा टाकल्यावर १५ दिवसांत नदीला जलपर्णीचा वेढा पडतो. यामुळे ही नदी आहे का एखादे मैदान, अशी परिस्थिती निर्माण होते.पाणीउपसा करणाºया वीज पंपाच्या फुटबॉलमध्ये जलपर्णी अडकतात. ती काढण्यासाठी शेतकºयांना जीव धघेक्यात घालून नदीत उतरावे लागते.पुणे व पिंपरी महानगरपालिका मैलामिश्रीत पाणीप्रकिया न करता नदीत सोडत असल्याने शेतात पाणी धरताना या पाण्याचा फेस तयार होऊन शेताचे आरोग्य धोक्यात आले आहे. डासांचे प्रमाण वाढलेले असून शेतीबरोबर नागरिकांच्या आरोग्यालाही बाधा पोहचत आहे.
भीमा नदीला जलपर्णीचा विळखा, रांजणगाव सांडस, वाळकी बेटाचे आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 2:08 AM