शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
2
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
3
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
4
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
5
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
6
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
7
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
8
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
9
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
10
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
11
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
12
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
13
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
14
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
15
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
16
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
17
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
18
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
19
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
20
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय

Amol Kolhe: महाराष्ट्रात सरकार बदलणार ही काळ्या दगडावरची रेघ - अमोल कोल्हे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 5:17 PM

संपूर्ण महाराष्ट्र शरद पवारांसोबत असल्याचे आताच्या लोकसभा निवडणुकीत दिसून आले

तळेघर (आंबेगाव तालुका) : आगामी काळात महाराष्ट्रातील सरकार बदलणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असे भाकीत शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी केले.

शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील गाव वाड्या-वस्त्यांना भेटी देऊन या भागाचा दौरा केला. यावेळी तेरुंगण (ढगेवाडी) येथे उपस्थितांना मार्गदर्शन करताना कोल्हे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, देशाचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी सुरुवातीला आदिवासी बांधवांसाठी स्वतंत्र बजेट काढले, जेव्हा जेव्हा आदिवासी बांधव अडचणीत, संकटात असतील तेव्हा शरद पवार त्यांच्या मागे ठाम उभे राहिले आहेत. याची उतराई म्हणून आदिवासी बांधव हे आजपर्यंत शरद पवारांना विसरले नाहीत त्याचे उदाहरण म्हणजे आताची लोकसभा निवडणूक आहे.  आता दोन-तीन महिने राहिले आहेत. महाराष्ट्राचे हे सरकार बदलणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे असे त्यांनी या वेळी सांगितले.

या दौऱ्यादरम्यान आदिवासींनी रस्ता, वीज, हिरडा, बेरोजगारी, पिण्याचे पाणी, शेतीसाठी पाणी, रेशनिंग कार्डवरती मिळणारे धान्य, नवीन रेशनिंग कार्ड फाॅरेस्टमधील अडीअडचणी याबाबतच्या अडीअडचणी कोल्हे यांच्या समोर मांडल्या. या अडीअडचणी समजून घेत लवकरच यावर तोडगा काढण्यात येईल असे कोल्हे यांनी आदिवासी बांधवांना सांगितले. या वेळी डाॅ. कोल्हे यांनी आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील तेरुंगण, राजपूर, तळेघर, फलोदे, जांभोरी, चिखली, पोखरी, डिंभे, शिनोली या गावांना भेटी देऊन येथील आदिवासी बांधवांचे प्रश्न व अनेक अडचणी समजावून घेतल्या. आदिवासी गावागावांमध्ये कोल्हे यांचा सत्कार करण्यात आला.

टॅग्स :PuneपुणेDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेPoliticsराजकारणSharad Pawarशरद पवारambegaonआंबेगाव