पुणे : महापालिकेत राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीची सत्ता आहे. मात्र, राष्ट्रवादीकडून आघाडीत ठरल्याप्रमाणे शब्द पाळला जात नाही. सत्तेत राहून मानहानी सहन करण्याऐवजी आघाडीतून बाहेर पडून विरोधकांची भूमिका बजाविण्याची तयारी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. महापालिका सत्ताधारी आघाडीतील अलिखित करारानुसार स्थायी समिती व पीएमपी संचालक पदाचे चौथे वर्षे काँग्रेसला देण्याचे ठरले होते. परंतु, स्थायी समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने मनसेची मदत घेऊन ऐनवेळी काँग्रेसची कोंडी केली. पीएमपी संचालकपदाच्या निवडणुकीत दोघांच्या भांडणात शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला. विषय समितीच्या निवडणुकीत काँग्रेसऐवजी मनसेला राष्ट्रवादीने पाठिंबा दिला. त्यामुळे सत्तेत राहूनही प्रत्येक वेळी राष्ट्रवादीकडून मानहानीची वागणूक दिली जात असेल, तर आघाडीतून बाहेर पडायला पाहिजे, अशा मागणींचे सर्वपक्षीय नगरसेवकांचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना पाठविण्यात आले होते.
शब्द पाळला नाही म्हणून काँग्रेस विरोधात बसणार?
By admin | Published: April 06, 2015 5:39 AM