राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंत्रिपदाची सूत्रे हातात घेताच, इंदापूर तालुक्यातील २२ गावांचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित विभागाचे जलसंपदामंत्री व संबंधित अधिकारी यांच्या समवेत अनेक यशस्वी बैठका प्राथमिक चर्चा केल्या आहेत. याच महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या पाणी विषयाला पवार होकार देणार, अशी अपेक्षा शेतकऱ्याला लागून राहिली आहे.
उजनी धरणाचे पाणी शेटफळगढे येथे टाकायचे व हेच पाणी २२ गावांना शेतीसाठी उपलब्ध करून द्यायचे. ही अभिनव योजना राबवून २२ गावांतील ओसाड पडिक क्षेत्र बागायती बनवायचा संकल्प राज्यमंत्री भरणे यांचा आहे.
उजनी धरणक्षेत्रात बुडीत बंधारे बांधून, हजारो शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका राज्यमंत्री भरणे यांनी आखली आहे. अशा लहान-मोठ्या अनेक पाण्यासंदर्भातील योजना, राज्यसरकाराकडुन मंजुरीसाठी अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यासंदर्भात मोठी घोषणा करतील, अशी अपेक्षा आहे.
_______________________________________