शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

...अखेर हरणेश्वर अँग्रो निघणार मोडकळीत ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 4:12 AM

-- कळस : इंदापूर तालुक्यातील कळस येथील शर्कराकंदापासून इथेनॉल निर्मिती करणारा हरणेश्‍वर ॲग्रो या प्रकल्पाचा अवसायक काढून लिलाव ...

--

कळस : इंदापूर तालुक्यातील कळस येथील शर्कराकंदापासून इथेनॉल निर्मिती करणारा हरणेश्‍वर ॲग्रो या प्रकल्पाचा अवसायक काढून लिलाव थांबवण्यासाठी कारखाना व्यावस्थापनाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी संध्याकाळपर्यंत न्यायालयाने सुनावणीसाठी तारीख दिली नाही, त्यामुळे कारखान्याचा मंगळवारी (दि. २०) लिलाव होऊन कारखाना मोडकळीस निघणार असल्याची शक्यता बळावली आहे. दरम्यान, स्थगिती आणण्यासाठी कारखाना संचालक प्रयत्नशील असल्याची माहिती माऊली चवरे यांनी दिली.

लिलावामुळे कारखान्याची मोठी मालमत्ता असूनही कारखाना कवडीमोल किमतीत भंगारात विकला जाण्याची शक्यता आहे. कारखाना व्यवस्थापनाने बँक व अवसायक यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यामध्ये कारखाना व्यावस्थापन कर्ज भरण्यास तयार असून लिलाव रद्ध करावा, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र सोमवार दि. १९ पर्यंत कोणतीही सुनावणीसाठी तारीख मिळाली नाही त्यामुळे लिलाव होण्याची शक्यता बळावली आहे.

शर्कराकंदपासून इथेनाॅल निर्मिती करण्यात यश न आल्याने त्यामधील अडचणी व शासन धोरण ओळखून साखर कारखाना परवाना मिळवण्यासाठी प्रयत्न झाला मात्र अंतराची अट आल्याने परवाना दिला गेला नाही त्यामुळे उसापासून गूळ पावडर,निर्मिती करण्यास सुरुवात झाली व गूळ पावडर,यावर ह्या कारखान्याची आर्थिक गणिते कोलमडली. कारखान्यावर अनेक बँकांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज झाले त्यामुळे कारखाना डबघाईला आला तडजोडीअंतर्गत सुमारे २५ कोटी रुपयांचे अनेक बँकाचे कर्ज आहे कारखान्याची स्थावर व मशनिरी अशी सुमारे ४५ कोटी रूपयांची मालमत्ता आहे मात्र लिलाव झाल्यास नुकसान होण्याची शक्यता आहे.

इथेनाॅल निर्मितीला प्रोस्ताहान देणारे केंद्रशासनाचे धोरण असल्याने २०२५ पर्यंत ३० टक्के इथेनाँल मिश्रणाला परवानगी मिळणार आहे. त्यामुळे प्रकल्पाचा लिलाव नुकसानकारक आहे कारखान्यावर सत्ता असणारी मंडळी पुर्वाश्रमीपासून भाजपात आहेत केंद्रात सरकार असूनही लक्ष दिले जात नाही ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे तसेच इंदापूर, बारामती, दौंड फलटण ,पुरंदर येथील सुमारे बारा हजार सभासदांनी आपले शेअर्स जमा केले होते त्यांचेही नुकसान होणार आहे .

जिल्हातील यशवंत सहकारी व हरणेश्वर अॅग्रो हे कारखाने कर्जाचा बोजा वाढल्याने एकाचवेळी बंद पडले व अवसायक नेमले गेले दोन्ही कारखान्यांकडे २०० एकर पेक्षा जास्त जमिनी आहेत यशवंत बचावासाठी जोरदार राजकिय व प्रशासकिय प्रयत्न चालु आहेत मात्र हरणेश्वरला कोणी कैवारीच राहीला नाही.

--

कोट

प्रकल्पाला स्थगिती मिळावी म्हणून आम्ही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, कोविडमुळे सुनावणी होऊ शकली नाही, त्यामुळे लिलावास स्थगिती मिळालेली नाही अवसायककडुन (मंगळवार, दि. २०) रोजी लिलावाची प्रकिया होणार असल्याने आम्ही उद्याही न्यायालयीन स्थगीतीसाठी प्रयत्नशील आहोत.

-माऊली चवरे,

संचालक