खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार त्यांच्या कार्यालयात केला केला. या वेळेस युवा नेते अजित गावडे, माजी सरपंच योगेश थोरात, राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब भोर, प्रा. अनिल शिंदे, उपाध्यक्ष सपंतराव पानमंद, दिपक रत्नपारखी, चेअरमन वसंत राळे, नितीन थोरात, दिपक दुडे पाटील आदी उपस्थित होते.
डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, निवडणुका झाल्यानंतर गावातील मतभेद विसरून, सर्वांना बरोबर घेऊन काम करायला हवे. या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात तरुण सदस्य निवडून आले आहेत. सध्या राज्यात आघाडीचे सरकार असल्याने निधी कमी पडणार नाही.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती वृक्षलागवड करून साजरी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
१४ टाकळी हाजी
नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करताना खासदार डॉ. अमोल कोल्हे.