व्यावसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे आयटीआय प्रवेश संख्येत वाढ व्हावी, यासाठी विद्यार्थी व पालकांमध्ये जागृती करण्यात आली. विद्यार्थ्यांनी दहावीनंतर आयटीआय पूर्ण केल्यास त्यांना तत्काळ रोजगाराची संधी प्राप्त होते. त्याचप्रमाणे स्वत:चा व्यावसायही करता येतो. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून आयटीआय अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. हमखास रोजगार देणारा हा अभ्यासक्रम असल्याने त्याला चांगलीच मागणी आहे.
-------------------------------------------
फिटर, इलेक्ट्रिशन, वेल्डरला पसंती
आयटीआय अभ्यासक्रमास अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली असली तरी फिटर, इलेक्ट्रिशन, वेल्डर आदी अभ्यासक्रमांनाच विद्यार्थ्यांकडून पसंती दिली जात आहे. या अभ्यासक्रमातून रोजगारासह व्यावसाय करण्याची मोठी संधी प्राप्त होते. त्यामुळे विद्यार्थी या अभ्यासक्रमाची निवड केली जात असल्याचे दिसून येत आहे.
---------------------
फिटर, इलेक्ट्रिशन अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या अनेक विद्यार्थ्यांना खासगी कंपन्यांकडून मागणी आहे. त्यामुळे विद्यार्थी या अभ्यासक्रमांना अर्ज करतात. शिक्षण घेत असताना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळत असल्याने आयटीआयकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे.
- मंगेश शिंदे, विद्यार्थी
-------------------
पुणे एकूण किती जागा उपलब्ध : ११,५५२
आतापर्यंत किती अर्ज आले: ३,०७९
जिल्ह्यातील शासकीय संस्था : ६१
जागा : ५,४६८
खासगी संख्या : १३८
जागा : ६,०८४
------------------
मागील वर्षी ११ हजार ५५२ जागांसाठी १५ हजार ८६५ विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. त्यामुळे अर्ज केलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीनुसार प्रवेश मिळू शकला नाही.
----