शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत? 'हे' यावेत किंवा 'ते' यावेत; पण...
2
Maharashtra Vidhan Sabha: आतापर्यंत कोणत्या पक्षाचा स्ट्राइक रेट राहिला सर्वाधिक?
3
दगाफटका टाळण्यासाठी काँग्रेसकडून खबरदारी, विदर्भातील आमदारांन विशेष विमानाने सुरक्षित ठिकाणी हलवणार
4
निवडणुकीत डिपॉझिट वाचवण्यासाठी उमेदवारांना किती मतांची गरज असते?; जाणून घ्या सविस्तर
5
मणिपुरात आमदाराच्या घरातून दीड कोटीचे दागिने लुटून नेले; जमावाने केली नासधूस
6
यशस्वीचा ऑस्ट्रेलियातील पहिला डाव अयशस्वी! टीम इंडियाचा युवा हिरो स्टार्कसमोर ठरला झिरो (VIDEO)
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कामात यशस्वी व्हाल, आर्थिक लाभ होण्याची शक्यता!
8
Zomato च्या झीरो सॅलरी ऑफरमध्ये नवा टर्न; बॅकफायरनंतर दीपिंदर गोयल यांनी आता काय केल?
9
जगभर : सौदी अरेबियाने १०१ परदेशी नागरिकांना लटकवलं फासावर!
10
याला म्हणतात संस्कार! कैलाश खेर समोर येताच गौरव मोरे पडला पाया, अभिनेत्यावर होतोय कौतुकाचा वर्षाव
11
IND vs AUS : बुमराहच्या नेतृत्वाखाली या दोन नव्या चेहऱ्यांना मिळाली पदार्पणाची संधी
12
‘ती’ वादग्रस्त विधाने आयोगाच्या रडारवर; केंद्रीय मुख्य आयुक्तांनी मागवले अहवाल
13
सत्ता आमचीच! सत्ताधारी महायुती आणि विरोधी मविआच्या नेत्यांचे दावे 
14
करवीर ते कुलाबा 40 टक्के मतांचे अंतर; असे का ते समजून घ्या!
15
टक्क्याचा धक्का कुणाला? निवडणुकीत मतदारांमध्ये सुप्त लाट
16
बीड जिल्ह्यात मतदान केंद्र फोडले; ४० जणांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल
17
दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानमध्ये ५० ठार; मृतांमध्ये आठ महिला, पाच लहान मुलांचा समावेश
18
Maharashtra Vidhan Sabha ELection 2024: मुंबईत कोणत्या शिवसेनेसाठी मतटक्का वाढला?
19
विशेष लेख: कट्टर उजवे आणि वादग्रस्त - ऑल द प्रेसिडेंट्स मेन....
20
अदानींवर अमेरिकेत लाचप्रकरणी खटला; आरोप निराधार, आम्ही निर्दोष : अदानी

आमदार अतुल बेनकेंना पुन्हा पक्षात घेणार?; शरद पवारांनी दिलेल्या उत्तराने अमोल कोल्हे खळखळून हसले! 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 12:18 PM

शरद पवार यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत तिरकस भाष्य करत सस्पेन्स कायम ठेवणं पसंत केल्याचं पाहायला मिळालं.

Sharad Pawar ( Marathi News ) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे जुन्नर विधानसभा मतदारसंघातील आमदार अतुल बेनके यांनी आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या निवासस्थानी झालेल्या या भेटीनंतर अतुल बेनके यांच्या पक्षांतराविषयी चर्चा रंगू लागल्या आहेत. याबाबत पत्रकार परिषदेदरम्यान शरद पवार यांनाही प्रश्न विचारण्यात आला. यावेळी पवार यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत तिरकस भाष्य करत सस्पेन्स कायम ठेवणं पसंत केल्याचं पाहायला मिळालं.

अतुल बेनके यांच्या भेटीविषयी विचारले असता शरद पवार म्हणाले की, "अतुल बेनके यांनी माझी भेट घेतली, यात नवीन काय आहे? त्यांचे वडील माझे मित्र होते. राजकारण होत असेल तर विधानसभा निवडणुकीवेळी त्याचा निकाल घेऊ. पण आता त्याबाबत चर्चा करण्याची आवश्यकता नाही. मात्र एक साधी गोष्ट आहे की, ज्यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आमच्या पक्षाच्या उमेदवाराचं काम केलं ते आमचे आहेत. ज्यांनी आमचं काम केलं त्यांच्या हिताची जपणूक करणं ही आमची जबाबदारी आहे," असं शरद पवारांनी म्हटलं. पवारांच्या या वक्तव्यानंतर अमोल कोल्हे यांच्यासह इतर उपस्थितही खळखळून हसले.  अतुल बेनके यांनी लोकसभा निवडणुकीत तुतारी चिन्हावरील उमेदवाराचं काम केल्याकडे पवार यांनी आपल्या वक्तव्यातून अंगुलीनिर्देश केल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.

दरम्यान, अतुल बेनके हे आगामी काळात तुमच्या पक्षात येणार का, असं विचारलं असता शरद पवारांनी म्हटलं की, "ते हल्ली कोणत्या पक्षात आहेत, हे मला माहीत नाही. आमच्यात कसलीही राजकीय चर्चा झाली नाही." 

लोकसभेदरम्यान जुन्नरमध्ये काय घडलं?

राष्ट्रवादीतील फुटीनंतर आमदार बेनके यांनी सहा महिने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती. मात्र नंतरच्या काळात त्यांनी अजित पवारांची साथ देण्याचा निर्णय घेतला. परंतु लोकसभा निवडणुकीत शिरूर मतदारसंघात अजित पवारांना मोठा धक्का बसला आणि शरद पवारांच्या पक्षाचे अमोल कोल्हे पुन्हा खासदार झाले. जुन्नर विधानसभा मतदारसंघातूनही कोल्हे यांनी मोठं मताधिक्य घेतलं होतं. या पार्श्वभूमीवर आता अतुल बेनके पुन्हा एकदा शरद पवारांच्या आश्रयाला जाण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. 

अजित पवारांसाठी धोक्याची घंटा

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने लढवलेल्या १० पैकी ८ जागांवर विजय मिळवला, तर अजित पवारांच्या पक्षाला अवघी एक जागा जिंकता आली. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदारांची धाकधूक वाढली असून यातील अनेक आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा शरद पवारांच्या पक्षाकडून केला जात आहे. अशातच आता भेटीगाठींचा जोर वाढल्याने आगामी काळात ही गळती रोखण्याचं मोठं आव्हान अजित पवार यांच्यासमोर असणार आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेjunnar-acजुन्नर