पुण्यातील सगळे रस्ते ८ दिवसांचा आत पुर्ववत झाले पाहिजेत असे आदेश पुणे महापालिकेचा अधिकाऱ्यांना सभागृह नेते गणेश बिडकर यांनी दिला आहे. पुण्यामध्ये झालेल्या रस्ते खोदाईचा पार्श्वभूमीवर हे आदेश देण्यात आला आहे.
पुण्यात २४*७ पाणीपुरवठा तसेच इतर कामांसाठी अनेक रस्त्यांची खोदाई करण्यात आली आहे. पुणे शहरात पावसाला सुरुवात झाली तरी अजूनही हे काम संपलेले नाहीये. यामुळे अनेक ठिकाणी ट्रॅफिक जॅम होत आहे तसेच चिखलातून वाट काढायची वेळ नागरिकांवर आली आहे. यावरून महापालिकेवर आणि सत्ताधाऱ्यांवर होणाऱ्या टीकेचा पार्श्वभूमीवर महापालिकेत तातडीने अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली. सर्व संबंधित विभागांचे अधिकारी, झोनल कमिशनर आणि सभागृह नेत्यांसहीत इतर पदाधिकारी आणि अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
बाकी असलेली कामे आठवडाभरात संपवावित तसेच जिथे काम पूर्ण झाले आहे तिथे डांबरीकरणाच्या ऐवजी काँक्रीटीकरण केले जावे असे आदेश बिडकर यांनी यावेळी दिले.
"जी कामे झाली आहेत आणि जिथे काँक्रिटीकरण करायचे आहे ते काँक्रिट चे करून घ्या असे आदेश दिले आहेत. त्यासाठी १२ मीटर चा पुढचा रस्त्यांना प्राधान्याने पूर्ण करा असे आदेश दिले आहेत. ज्या भागात खोदाई करण्यात आली आहे तेवढे भाग डांबरी करून उपयोग होणार नाही म्हणून काँक्रिट चे करण्यात येतील तर इतर भागाचे काँक्रीटीकरण हे नंतर पूर्ण करण्यात येईल "असे बिडकर यांनी सांगितले.