शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

दोन्ही महापौरांसह जिल्हा परिषद अध्यक्ष बदलणार?

By admin | Published: January 09, 2016 1:38 AM

फक्त पुण्याचे महापौरच का? पिंपरी-चिंचवडचे महापौर व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदातही बदल करू या, नव्यांना संधीही मिळेल व आगामी सार्वत्रिक

पुणे : फक्त पुण्याचे महापौरच का? पिंपरी-चिंचवडचे महापौर व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदातही बदल करू या, नव्यांना संधीही मिळेल व आगामी सार्वत्रिक निवडणूक लक्षात घेता पक्षासाठीही ते उपयुक्त ठरेल, असा विचार राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत शुक्रवारी व्यक्त केला असल्याचे समजते. त्यामुळे पुण्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे, पिंपरी-चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांचा राजीनामा येत्या काही दिवसांत घेतला जाईल, अशी चर्चा आहे.पुणे जिल्ह्यातील या तिन्ही महत्त्वाच्या पदांसाठी अजित पवार यांनी सव्वा वर्षाची मुदत निश्चित केली होती. ती आता पूर्ण झाली आहे. त्यानंतरच लगेचच या पदासाठी इच्छुक असलेल्यांच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र, अजित पवार काही आठवडे इथे नसल्यामुळे सर्व गोष्टी फक्त चर्चेच्या पातळीवरच होत्या. पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त झालेला पुण्यातील कार्यक्रम यशस्वी केल्यानिमित्त कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या स्नेहमेळाव्यासाठी अजित पवार आज पुण्यात होते.सकाळपासूनच त्यांच्या बैठका सुरू होत्या. दुपारी काही प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना त्यांनी या तिन्ही पदांचे राजीनामे एकाच वेळी घेण्याचा व त्यावर नव्या नियुक्त्या करण्याचा विचार व्यक्त केला. त्याला काही जणांना दुजोरा दिला.काही जणांना मात्र या पदांसाठी इच्छुकांची भाऊगर्दी आहे; त्यामुळे एका-एका पदाची निवड करू, असे सुचविले. मात्र, अजित पवार यांनी इच्छुकांची संख्या जास्त असेल, तर ते पक्षासाठी चांगलेच आहे. आपण योग्य व्यक्तीची निवड करू, असे स्पष्ट केले असल्याचे समजते. त्यांनी तिन्ही पदांचा बदल करण्याचे संकेत दिले असल्याने साधारण मंगळवारी या पदाधिकाऱ्यांचा राजीनामे घेतले जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर राजकीय हालचाली अधिक गतिमान होतील, असे दिसते. (प्रतिनिधी)