पुणे : चिंचवड विधानसभा पोट निवडणूकीतमहाविकास आघाडीचा उमेदवारी नाना काटे यांना जाहीर करण्यात आली. महाविकास आघाडीकडूननिवडणूक लढवण्याच ठरल्यावर राहुल कलाटे आणि नाना काटे यांची नावे चर्चेत होती. उमेदवारीचा तिढा सुटत नसताना अखेर नाना काटे याना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर राहुल कलाटे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी कलाटे हे चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकित अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. राष्ट्रवादी नेत्यांनी समजूत काढूनही राहूल कलाटे अपक्ष लढण्यावर ठाम आहेत. त्यामुळे आता थेट ठाकरे गटाचे सचिन अहिर राहुल कलाटे यांच्या भेटीला चिंचवडमध्ये दाखल झाले आहेत.
आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने कलाटे अहिर यांचं ऐकणार का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. राहुल कलाटे यांना मागील निवडणुकीत १ लाखाहूनही अधिक मते मिळाली होती. तसेच जनतेचा माझ्यावर विश्वास असल्याचे त्यांनी अपक्षचा उमेदवारीचा अर्ज भरताना सांगितले होते. त्यानंतर महाविकास आघाडीने धसका घेतला आहे. मते विभागली जाऊ नयेत. यासाठी आघाडी प्रयत्नशील असून ते राहुल कलाटे यांना माघार घेण्यासाठी विनंती करत आहेत. परंतु आजपर्यंत कलाटे यांनी अर्ज मागे घेतला नाही. आज अखेर सचिन आहिर यांना कलाटे यांची मनधरणी करण्यासाठी चिंचवडमध्ये दाखल झाले आहेत. दोघांच्या बैठकीनंतर कलाटे यांचा निर्णय समोर येणार आहे.
कसब्यातून दाभेकर यांनी केली होती बंडखोरी
कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या बाळासाहेब दाभेकर यांनी बंडखोरी केली होती. त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांची मनधरणी केली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार आमदार संग्राम थोपटे, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, धनंजय वाडकर, अभय छाजेड, कमल व्यवहारे, अजित दरेकर, रफिक शेख, मेहबूब नादाफ यांनी दाभेकर यांच्याशी चर्चा केली. पक्षाच्या वतीने तुम्हाला पुढे संधी देण्यात येईल असेही सांगण्यात आले. अखेर पक्षश्रेष्ठींचे ऐकून कसबा विधानसभा पोटनिवडणूकीतून दाभेकर यांनी माघार घेतली.
काय म्हणाले राहुल कलाटे
मला मागच्या वेळी १ लाखाहूनही अधिक माते मिळाली होती. २०१४, २०१९ ला मला असंख्य मते देऊन जनतेने माझ्यावरचा विश्वास दाखवला होता. मला त्याबाबत आत्मविश्वास होता. महाविकास आघडीकडे मी प्रमुख दावेदार होतो. त्या पार्श्वभूमीवर उमेदवारी मागत होतो. परंतु काय झालं ते वरिष्ठचा सांगतील. लक्ष्मण जगताप यांच्यामुळे निवडणूक बिनविरोध होईल असे वाटत होते. परंतु आघाडीने निवडणूक लढवणार असल्याचे ठरवल्यावर मी इच्छुक म्हणून उमेदवारी मागितली होती.