शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
10
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
11
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
12
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
13
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
14
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
15
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
16
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
18
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
19
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
20
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू

बैलगाडासंदर्भात लवकर सुनावणीसाठी न्यायालयाला विनंती करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 4:16 AM

लोकमत न्यूज नेटवर्क मंचर: शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या बैलगाडा शर्यती सुरू व्हाव्यात, यासाठी बैलगाडा मालकांच्या शिष्टमंडळाने गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मंचर: शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या बैलगाडा शर्यती सुरू व्हाव्यात, यासाठी बैलगाडा मालकांच्या शिष्टमंडळाने गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची मंगळवारी भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी वळसे पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयातील सरकारी वकील सचिन पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून यासंदर्भातील तत्काळ सुनावणीसाठी न्यायालयाला विनंती करावी, अशी सूचना केली.

अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटनेच्या वतीने बैलगाडा मालक शशिकांत भालेराव, पप्पूशेठ येवले, अमोल गायकवाड, के. के. थोरात, बाळासाहेब आरुडे यांनी आज गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, बैलगाडा शर्यतीची महाराष्ट्राला सुमारे चारशे वर्षांपूर्वीची परंपरा आहे. पारंपरिक वारसा व शेतकऱ्यांचा आवडता छंद म्हणून बैलगाडा शर्यतीकडे पाहिले जाते.

तमिळनाडू व कर्नाटक या राज्यांमध्ये बैलगाडा शर्यतीबाबत कायदा केलेला आहे. याच कायद्याच्या धर्तीवर बैलगाडा शर्यती चालू करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एप्रिल २०१७ मध्ये कायदा केलेला आहे. परंतु या कायद्यास मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मुंबई उच्च न्यायालयाने या सुनावणीदरम्यान सांगितले की, यापूर्वी सन २०१४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी घातलेली आहे. सर्वोच्च न्यायालय हे ॲपेक्स कोर्ट आहे, ॲपेक्स कोर्टाची बंदी असताना आम्ही याबाबत अंतिम निकाल देणे योग्य नाही म्हणून राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात याबाबत दाद मागावी. तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या यापूर्वीच्या ऑर्डरचा अवमान होऊ नये म्हणून राज्यातील बैलगाडा शर्यती तूर्तास बंद ठेवाव्यात, असे उच्च न्यायालयाने सांगितले. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने यानुसार सदर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात दाखल केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनाची ही स्वतंत्र याचिका विस्तारित खंडपीठाकडे म्हणजेच पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे वर्ग केलेली आहे. तसेच, त्यानंतर महाराष्ट्र शासनाने बैलांच्या धावण्याच्या क्षमतेबाबत समिती नेमून सदर समितीचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केलेला आहे. या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयात मागील तीन वर्षांत कोणत्याही प्रकारची सुनावणी झालेली नाही. परंतु, तमिळनाडू व कर्नाटकमध्ये याच धर्तीवर कायदा केलेला असून सुद्धा तेथील शर्यतीस सर्वोच्च न्यायालयाने अद्याप बंदी घातलेली नाही. बैलगाडा शर्यतीचे केससाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने सीनियर कौन्सिल ॲड. मुकुल रोहतगी, ॲड. शेखर नाफडे, ॲड. तुषार मेहता व सरकारी वकील ॲड. राहुल चिटणीस, ॲड. सचिन पाटील हे कामकाज पाहत आहेत. हे निवेदन स्वीकारल्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सरकारी वकील ॲड. सचिन पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला व सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारच्या वतीने तत्काळ सुनावणी व्हावी अशी सूचना केली आहे. बैलगाडा मालकांनी हा विषय राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या कानावर घालून जिल्ह्यातील सर्व आमदार व खासदार यांची बैठक घेऊन मार्गदर्शन करण्याची विनंती वळसे-पाटील यांना केली. त्यावेळी वळसे पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. बैलगाडा मालकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

फोटो आहे : बैलगाडा शर्यंतीबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना निवेदन देताना बैलगाडा मालक.