पुणे : वडगाव शेरीला महायुतीचे उमेदवार सुनील टिंगरे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बापू पठारे यांच्यात दुरंगी लढत होणार आहे. आज सुनील टिंगरेंच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून विरोधकांवर निशाणा साधत सज्जड दम भरला आहे.
अजित पवार म्हणाले, वडगाव शेरी आपल्यात फूट पाडण्याचं काम केलं जाईल. आपण नीट वागलो तर आपल्याला दोन आमदार मिळणार आहेत. तुम्ही सगळ्यांनी एक जिवाने काम करा. तुम्ही एका आमदार आम्हाला आणून द्या आणि हक्काने सांगा आता महायुतीचा दुसरा जगदीश मुळीक आमदार द्या. आपण गाफील राहू नका. आज इथं दडपशाही सुरु आहे. इथं दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय. वडगाव शेरीत आमचे कार्यकर्ते प्रचार करत आहेत. त्यांना फोन केला जातो. की तुझ्याकडे बघून घेईल. आरे आम्ही काय हातात बांगड्या भरल्या आहेत का? मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. जो पर्यंत सरळ तोपर्यंत सरळ आहे. आरे ला कारे म्हणण्याचीही आमची ताकद आहे. जे काय धमकी देत आहेत. त्यांना आमदारकीचा चेहरा मी दाखवला आहे. त्यांची सगळ्याची अंडी पिल्ली माझ्याकडे आहेत. त्यामुळे तुम्ही घाबरू नका असं अजित पवार म्हणाले आहेत.
मुळीकांना विधिमंडळाचा दरवाजा दाखवणार
आपल्याला राज्यात महायुतीचं सरकार आणायचं आहे, वेगवगेळे नेते मार्गदर्शन करत आहेत. वडगाव शेरीला आता महत्व आलंय. आयटी बरोबर इतरही कंपनी इथं आल्या आहेत. त्यामुळे या मतदार संघाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालंय. सुनील टिंगरे, जगदीश मुळीक आणि त्याअगोदर बापू पठारे यांनी वडगाव शेरीचं प्रतिनिधित्व केलं. आपल्याला आता या मतदार संघाचा विकास करायचा आहे. आपण सगळ्यांनी आता एकोपा ठेवायला हवा. ८ उमेदवार उभे केले आहेत. मनामध्ये किंतु न ठेवता गैरसमज न करून घेता सहकार्य केलं पाहिजे. आपल्याला महायुतीची सत्ता आणायची आहे. काही ठिकाणी कार्यकर्ते कामाला लागले नाहीत. आम्ही राष्ट्रवादीत असताना अनेक जण उमेदवारी मागत होते. त्यावेळेस आम्ही पठारे यांना तिकीट नाकारलं. टिंगरेंना तिकीट दिलं, ते निवडून आले. आज खरंतर मुळीक यांना आमदार व्हायचं होत. टिंगरे यांना पण आमदार व्हायचं होत. तेव्हा आम्हाला उमेदवारी देताना तारेवरची कसरत करावी लागली. वडगाव शेरीला दोन्ही उमेदवार तगडे होते. मुळीक यांना लोकसभेला देण्याची चर्चा झाली होती. तेव्हा मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली आणि ते खासदार झाले. तेव्हा अमित शाह यांनी मिटिंग घेतली. एकोपा राहण्यासाठी इतर घटक पक्षांनाही निवडून आणायचे आहे. एक एक जागा महत्वाची आहे. असेही त्यांनी सांगितले होते. त्यादिवशी पक्षाचे आदेश मानून मुळीक यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. आम्ही जगदीश मुळीक यांना विधिमंडळाचा दरवाजा दाखवण्याचे काम आम्ही करू.
आरे थापा कशाला मारताय
अजित पवारांनी विरोधकांवर यावेळी निशाणा साधला. तुम्ही फेक नॅरेटिव्ह करता, आरक्षण काढणार, घटना बदलणार असं म्हणता. पंतप्रधानांनी तर संविधानासमोर नतमस्तक होऊन शपथ घेतली. आम्ही संविधानाला महत्व देतो. काँग्रेसने संविधान पराभूत करण्याचं काम केलं. आणि त्यांना आता पुळका आलाय. यांचे खायचे दात वेगळे आहेत. ओठात एक पोटात एक अशी अवस्था आहे. आम्ही मुख्यमंत्री लाडकी योजना, उज्वला गॅस योजना, शेतकऱ्यांची योजना आणली. शेतकऱ्यांना अनुदान सुरु केलं. दुधासाठी ग्राहक आणि शेतकरी दोघेही आता अडचणीत नाहीत. अर्थसंकल्पात ७५ हजार कोटींचा भर उचलला आहे. आमचा अर्थसंकल्प महिला , शेतकरी, युवकांना आपलासा वाटणारा केला आहे. राज्याला कर्जबाजारी केलं असा आरोप त्यांनी केला. महिलांना सांगितलं की ही फसवी गोष्ट आहे. स्वतः काही करायचं नाही दुसऱ्याला काही करू द्यायचं नाही. मला लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांची वीज माफी योजना चालू ठेवायची आहे. आम्हाला नाव ठेवली आता यांनी काल पंचसूत्री जाहीर केली. आम्ही ३ हजार देणार. मुलांना ४ हजार देणार. मुलींना आणि मुलांनाही मोफत शिक्षण देणार. साडेसहा लाख कोटी खर्च येणार. आपलं उत्पन्न साडेसहा लाख कोटी आहे. आरे थापा कशाला मारताय असं अजित पवार म्हणाले आहेत.