जेजुरी : मोठ्या कष्टाने जिरायती जमिनी आम्ही बागायती केल्या आहेत. गावाच्या शिवारात आता ८० टक्के जमिनी बागायती आहेत. अशा वेळी या परिसरात विमानतळ कसे करता? असा सवाल उपस्थित करीत पांडेश्वर च्या ग्रामस्थांनी प्रसंगी आम्ही आत्मदहन करू परंतु पण पण एक इंच ही विमानतळाला जमीन देणार नाही, असा निर्धार पांडेश्वर येथील ग्रामस्थांनी ही दिला आहे.
पुरंदर तालुक्यातील पारगाव व सात गावांच्या परिसरात छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार आहे. मात्र, तेथील ग्रामस्थांचा विरोध पाहता विमान प्राधिकरणाकडून नव्याने याच गावांच्या पूर्वेकडे रिसे, पिसे पांडेश्वर या परिसरातील जागा ही योग्य असल्याने या ठिकाणी ही सर्वेक्षण करण्याचा प्रस्ताव आहे. तशा बातम्याही वर्तमानपत्रातून आल्याने यापरिसरात मोठी खळबळ माजली आहे. पारगाव व सात गावांप्रमानेच या ही परिसरातून विमानतळाला विरोध होऊ लागला आहे. काल रिसे पिसे या परिसरातील ग्रामस्थांनी विमानतळाला मोठा विरोध दर्शविला आहे. तर आज पांडेश्वर येथे ही विमानतळाला विरोध आणि पुढील दिशा ठरवण्यासाठी ग्रामस्थांनी बैठक घेतली होती.
बैठकीला पुरंदर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माणिक झेंडे, माजी सरपंच उत्तम शिंदे, संजय जगताप, शैलेश रोमन, पंढरीनाथ सोनवणे, विलास नाळे,अनिल शेंडगे आदिंनी मार्गदर्शन केले.
येथील शेतकऱ्यांनी योग्य नियोजन आणि मोठया कष्टांने जाणाई शिरसाई व पुरंदर उपसा जलसिंचन योजनेच्या माध्यमातून सातशे एकर ऊस उत्पादन घेतले आहे. डाळिंब, सीताफळ, पेरू आदींच्या फळबागा फुलवल्या आहेत. पांडेश्वरच्या शिवारातील ८० टक्के शिवार बागायती आहे. येथील शेतकरी, तरुण आधुनिक पद्धतीने शेती करू लागले आहेत. अशावेळी शासनाने विमानतळाऐवजी मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात. शासनाने सुविधा पुरवून इथला विकास साधण्याऐवजी विमानतळाला जमिनी घेऊन आम्हाला भकास करू नये. इथला कोणीही शेतकरी विमानतळाला एक इंचही जमीन देणार नाही. प्रसंगी आत्मदहन करू असा इशारा सर्वच ग्रामस्थांनी देत विमानतळाला प्रखर विरोध दर्शविला आहे. यावेळी विमानतळ हटवा, गाव वाचवा अशा घोषणा ही देण्यात आल्या.
फोटो मेल केला आहे