शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA  Live Match : भारतीय संघाने टॉस जिंकून अर्धी लढाई जिंकली, रोहित शर्माचा सहकाऱ्यांना सल्ला
2
30% इन्कम टॅक्स, 20% जीएसटी, प्रॉपर्टी टॅक्स... जे वाचले त्यातून हॉस्पिटल उघडलेले; तुंबलेल्या दिल्लीवर डॉक्टरची पोस्ट
3
लेक लाडकी योजनेचे काय झाले? तुम्ही केलेले काम लोक विसरले वाटतेय का; वर्षा गायकवाडांचा शिंदेंना टोला
4
“राहुल गांधींना पंतप्रधानपदाचे चेहरे केले असते तर २५ ते ३० जागा वाढल्या असत्या”: संजय राऊत
5
संत ज्ञानेश्वर महाराजांचा प्रस्थान सोहळा संपन्न; उद्या सकाळी आजोळघरातून होणार प्रस्थान
6
“मनोज जरांगे हे तर राजकारणाचे आयकॉन, १० दिवसांत...”; अब्दुल सत्तार यांचे मोठे विधान
7
“काँग्रेसला जमत नाही म्हणून भाजपा-शिंदे गट सत्तेत आहे”; बच्चू कडूंचा खोचक टोला
8
माझं मन सांगतंय दक्षिण आफ्रिका जिंकायला हवी, पण...! Shoaib Akhtar चं फायनलपूर्वी मोठं भाकित
9
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर; माता भगिनींनी CM एकनाथ शिंदेंना बांधल्या राख्या
10
कर्नाटक काँग्रेसमध्ये कलह! मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांमध्ये वाद?; डीके शिवकुमार यांनी कार्यकर्त्यांना दिल्या 'या' सूचना
11
"अतिरिक्त अर्थसंकल्पाला मान्यता नसताना जीआर काढणे हा हक्कभंग’’, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप 
12
भाजपातून जदयूत आले, नितीशकुमारांनी पक्षाचा कार्यकारी अध्यक्ष केले; उत्तराधिकारी की...?
13
बाईकची चाचणी देऊन मिळवलं क्रेन चालवण्याचे लायसन्स; अंधेरी RTO च्या भ्रष्टाचावरुन वडेट्टीवारांचे ताशेरे
14
"आपल्याकडे हिरो ठरवतो सिनेमाची हिरोईन", संस्कृती बालगुडेनं सांगितलं सिनेइंडस्ट्रीतील धक्कादायक वास्तव
15
सशक्त पक्षसंघटना, मोदी, योगींची लोकप्रियता, तरीही UPमध्ये भाजपाचा पराभव का झाला? अहवालातून धक्कादायक माहिती समोर 
16
“लोकसभेत १५५ विधानसभा मतदारसंघात भाजपा पराभूत, इथे सत्ता बदलणारच...”: शरद पवार
17
भारतीय संघाकडून दक्षिण आफ्रिकेची बेक्कार धुलाई; क्रिकेट विश्वात नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड
18
पुण्यातील पब्स आणि बारवर महापालिकेची कारवाई, मराठी अभिनेता म्हणतो- "इतकी वर्ष मोकाट चालू दिलं..."
19
गजकेसरी योग: ८ राशींना लाभच लाभ, भाग्याचा काळ; यश-प्रगती, पदोन्नती-नफा कमवायची संधी!
20
काय हे आयसीसी...! विजेत्या संघाला किती बक्षीस मिळणार? IPL पेक्षा काही लाखच जास्त...

पुणे जिल्ह्यात नवीन महापालिका होणार? शासनाने मागविला अहवाल

By ज्ञानेश्वर भंडारे | Published: January 25, 2024 3:54 PM

याबाबत अभिप्रायासह विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडून राज्य शासनाने अहवाल मागविला आहे....

पिंपरी :पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेनंतर आता पुणे जिल्ह्यात आणखी एक महापालिकेची स्थापना होणार आहे. चाकण नगरपरिषद, आळंदी नगरपरिषद आणि राजगुरू नगरपरिषद तसेच त्यांच्या लगतच्या परिसरातील गावांची नवीन महापालिका निर्माण केली जाणार आहे. याबाबत अभिप्रायासह विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडून राज्य शासनाने अहवाल मागविला आहे.

पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात गावांचा समावेश होऊन महापालिकांची हद्दवाढ झालेली आहे. त्यामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरालगतच्या परिसरातील नवीन गावांचा या दोन्ही महापालिकेत समावेश करणे योग्य होणार नाही. चाकण नगरपरिषद, आळंदी नगरपरिषद व राजगुरू नगरपरिषद तसेच त्यांच्या लगतच्या परिसरातील गावांची नवीन महापालिका निर्माण करणे याबाबत मागणी होत आहे. चाकण, आळंदी आणि राजगुरू नगरपरिषद तसेच त्यांच्या परिसरालगतच्या आसपासच्या गावांचा समावेश करून नवीन स्वतंत्र महापालिका करणे राज्य शासनाच्या विचाराधिन आहे.

त्यासाठी चाकण नगरपरिषद, आळंदी नगरपरिषद व राजगुरू नगरपरिषद तसेच त्यांच्या लगतच्या परिसरातील आसपासच्या गावांचे एकूण क्षेत्रफळ, लोकसंख्या, हद्द याबाबतचा तपशिल घ्यावा. तिन्ही नगरपरिषदेतील हद्दीची एक स्वतंत्र महापालिका स्थापन करण्याबाबत जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त, पिंपरी-चिंचवड, पुणे महापालिका आयुक्त आणि चाकण, आळंदी, राजगुरू नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांचा अहवाल मागवून घ्यावा आणि अभिप्रायासह शासनाने विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडून अहवाल मागविला आहे.हद्दवाढी नको महापालिकाच बनवा...

पत्र राज्य शासनाच्या उपसचिव प्रियंका कुलकर्णी यांनी पुण्याचे विभागीय आयुक्त यांना पाठवले आहे. त्यामुळे एकीकडे मागील आठ वर्ष हद्द वाढीच्या विषयावर अडकून पडलेल्या तिन्ही नगरपरिषदा मिळून नवीन महानगरपालिका होणार का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच स्थानिक नेते व नागरिकांचीही स्वतंत्र्य महापालिकेची मागणी होती.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड