पुणे : वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर लसीकरणासाठी आता सरकार थेट खासगी क्षेत्राची मदत घेणार आहे. आज सरकारकडून याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सूत्रांनी 'लोकमत'ला दिलेल्या माहितीनुसार, खासगी दवाखाने आणि त्याचबरोबर खासगी क्षेत्राकडून थेट लसीकरण सुरू करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जाणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढायला लागली आहे. त्याच पार्श्वभूमीवर सरकारकडून सर्वसामान्यांसाठी लसीकरण खुलं केलं जावं अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून पुढे येत होती. आज या संदर्भात केंद्रीय आरोग्य सचिवांसमवेत पुण्यातील काही उद्योजकांची बैठक झाली.
यावेळी चाचण्यांची क्षमता वाढवणे rt-pcr टेस्टिंग वाढवणे याबरोबरच एन आय व्ही वरचे अवलंबित्व कमी करणे अशा अनेक सूचना देण्यात आल्या. पेशंटची वेळेवर तपासणी न होणे गृह विलगीकरण आत असलेल्या पेशंट चा ट्रॅक्टर ठेवला जाणे तसेच कोरोना साठीचे जे निर्बंध घालण्यात आले आहेत त्याच्या बाबतीत नागरिकांकडून होणारा निष्काळजीपणा अशा अनेक मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली.
याच पार्श्वभूमीवर ती आता केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडून खासगी उद्योजकांचा लसीकरणामध्ये थेट सहभाग घेण्यासंबंधी घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. या माध्यमातून खासगी रुग्णालयांकडून नेमके किती चार्जेस घेतले जाऊ शकतात यावरही निर्बंध लादण्यात येणार आहेत तसेच जशी करण्यासाठीची प्रक्रिया देखील स्पष्ट केली जाणार आहे. सरकारी यंत्रणांकडून लसीची उपलब्धता आणि मान्यता या दोन्ही बाबींची जबाबदारी घेतली जाईल. कोव्हीन ॲप वर नोंदणी करूनच हे लसीकरण केले जाणार आहे. अर्थात या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी खुली होणार का अजूनही सरकारने ठरवलेल्या क्रमानेच हे लसीकरण केले जाणार हे स्पष्ट झालेले नाही.