वरवंड : विकासासाठी महायुतीला विजयी करा या देशाला मोदीजींनी पुढे नेण्याचा प्रयत्न केला. दौंड बारामती मतदारसंघात पिण्याचा प्रश्न रेल्वेचा प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी आपला खासदार निवडणे गरजेचे असल्याचे अजित पवारांनी सांगितले आहे. दौंड तालुक्यातील वरवंड येथे महायुती उमेदवार सुनेत्रा पवार यांचा प्रचारासाठी अजित पवार आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
अजित पवार म्हणाले की, विरोधातील खासदार असेल तर त्याला निधी कमी मिळतो. नुसते भाषणे करायचे याने निधी मिळत नाही. बाकीचे कामे करण्यासाठी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेत असणे गरजेचे आहे. बहुजन मागासवर्गीय आदिवासी यांना बरोबर आणायचे आहे. त्यांची कामे करायची आहेत. खासदाराने लोकलसाठी प्रयत्न का केला नाही दौंड पुणे लोकल होणे गरजेचे आहे. मात्र त्यांनी कोणत्याही प्रकारचा प्रयत्न केला नसल्याचे दिसत आहे.
मोदींच्या विचारांचा खासदार पाहिजे. यासाठी मोठ्या प्रमाणात सहकार्य करा. रुसवे फुगवे बाजूला ठेवा. रमेश थोरात राहुल कुल एकत्र काम करत आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र काम करा. आम्ही सगळे एकत्र आलो कारण की, खडकवासला पाण्याचा प्रश्न निराडावा कालवा पाण्याचा प्रश्न, टाटाचे पाणी, नदीतील जलपर्णी बाबत योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी उपाय योजना, वरसगाव पानशेत खडकवासला हक्काच्या पाण्यासाठी उपाययोजना चालू आहेत. भावनिक होऊ नका. जाती पातीचे राजकारण करू नका. कालच्या सभेत एकाने अजित पवाराने भीमापाठ सहकारी साखर कारखाना बंद पाडला असे बतावणी केली होती. त्याचा माझा काही संबंध नाही. माझा स्वभाव तसा नाही. एक घाव दोन तुकडे करेल पण असे शेतकऱ्यांचे वाटोळ करणार नाही. इतर सगळेच बंद पडलेले कारखाने माझ्या नावावर टाकतील. मात्र लोक असेच भावनिक करतील याला बळी पडू नका. तालुक्याचा विकास करायचा असेल. सुजलाम सुफलाम करायचा असेल तर विकासाला मतदान करा असे विरोधकांवर तोंड सुख घेतले.