सासवड : नगरपालिकेच्या नूतन सदस्यांच्या बैठकीत उपनगराध्यक्षपदी विजय शिवाजीराव वढणे यांची, तर स्वीकृत नगरसेवकपदी गणेश जगताप आणि दिनेश भिंताडे यांची निवड झाल्याचे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष मार्तंड भोंडे यांनी जाहीर केले. याप्रसंगी गटनेत्या आनंदीकाकी जगताप, मुख्याधिकारी विनोद जळक उपस्थित होते. उपनगराध्यक्षपदी निवड झालेले विजय वढणे, प्रभाग क्रमांक २ ब मधून निवडून आले असून, यापूर्वीही त्यांनी उपनगराध्यक्षपद भूषविलेले आहे. सासवड नगरपालिकेमध्ये जनमत विकास आघाडीचे नगराध्यक्षांसह १६ सदस्य असल्यामुळे त्यांच्या गटाचे दोन स्वीकृत सदस्य निवडले. आनंदीकाकी जगताप यांनी या दोन्ही नावांची शिफारस केली. गणेश जगताप हे पुरंदर तालुका युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष आहेत. दिनेश भिंताडे हे त्यांच्या जनसेवा युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. तीनही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी माजी आमदार चंदुकाका जगताप, जनमतचे नेते संजय जगताप, आनंदीकाकी जगताप आणि सर्व सदस्यांचे आभार मानले. नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, मुख्याधिकारी विनोद जळक, मावळते उपनगराध्यक्ष सुहास लांडगे, पुष्पा नंदकुमार जगताप, यशवंतकाका जगताप, संभाजी जगताप यांनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी नगरसेवक अजित जगताप, संदीप जगताप, संजय ग. जगताप, प्रवीण भोंडे, दीपक टकले, सचिन भोंगळे, नगरसेविका वसुधा आनंदे, माया जगताप, सीमा भोंगळे, निर्मला जगताप, सारिका हिवरकर, विद्या टिळेकर, मंगल म्हेत्रे, डॉ अस्मिता रणपिसे यांसह पालिकेच्या सर्व विभागांचे प्रमुख, जनमत विकास आघाडीचे अनेक कार्यकर्ते, सासवड आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)
सासवडच्या उपनगराध्यक्षपदी विजय वढणे
By admin | Published: February 18, 2017 2:46 AM