पुणे : खेड व दौंड तालुक्यामध्ये वादळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला. त्यामध्ये काही घरांचे पत्रे उडून गेले तर पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.दावडी (ता. खेड) परिसरात वादळी वाऱ्यासह परतीच्या पावसाने पिके भुईसपाट झाली. तासभर चाललेल्या या पावसाने शेतातील ऊस, मका व नुकतीच लागवड केलेली कांदारोपे आडवी झाली. दरम्यान, पाटेठाण (ता. दौंड) येथील श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्याजवळ असलेल्या देशमुख पठारवस्ती येथे शनिवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामुळे घरांची आणि जनावरांच्या गोठ्यांचे पत्रे उडून गेले. भिंतीच्या विटा अंगावर पडल्यामुळे एका शेतकऱ्यासह ५ ते ६ मजुर महिला जखमी झाले आहेत. दिलीप देशमुख असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. परिसरातील टाकळीभीमा, मेमाणवाडी या भागात पिके भुई सपाट झाली आहे. तसेच बोरीबेल (ता. दौंड) परिसरातील लगडवस्ती येथे वीज पडून दोन बैलांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. (प्रतिनिधी)
खेड, दौंडला वादळी पाऊस
By admin | Published: October 06, 2014 6:28 AM