पुणे :राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्वच्छतेवर भर दिला. त्यामुळे सध्या देशात स्वच्छता मोहीम वेगाने सुरू आहे. हा स्वच्छतेचा वसा विंग कमांडरने घेतला असून, त्यांनी हे मिशन म्हणून हाती घेतले आहे. 'स्वच्छ पुणे स्वच्छ भारत' या संकल्पेनूतन विंग कमांडर पुनीत शर्मा यांनी चार वर्षांपूर्वी स्वच्छता मोहीम सुरू केली. त्यामध्ये आता शहरातील विविध संस्था सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे हे अभियान अधिक मोठ्या प्रमाणावर बदल घडवण्यासाठी सज्ज झाले आहे.देशात पाच वर्षांपूर्वी स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली. तेव्हा पुनीत शर्मा यांनी 'स्वच्छ पुणे स्वच्छ भारत' हे अभियान सुरू केले. त्याला येत्या २ ऑक्टोबर २०१९ रोजी पाच वर्षे पूर्ण होत आहेत. या वर्धापनदिनानिमित्त विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्यामध्ये फ्लॅशमॉब मार्फत जनजागृती, महा कॅनव्हास पेंटिंग इव्हेंट, मुठा नदीच्या काठावर अनेक ठिकाणी महास्वच्छता अभियान, बसस्थानक, रेल्वे स्थानके येथे महा जनजागृती अभियान,सर्व सोसायटी व स्थानिकांनाही यात सहभागी करून घेण्यात येणार आहे. आतापर्यंत अभियानातंर्गत दर रविवारी शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. हा उपक्रम आजतागायत सुरूच आहे. त्यात खंड पडलेला नाही. रेल्वे स्थानक, कवडी पाट, सिंहगड, टेकड्या आदी ठिकाणांवर ही मोहीम घेण्यात येते. त्यामध्ये अनेक तरूण-तरूणी आणि ज्येष्ठ देखील सहभागी होत आहेत. पाचव्या वर्धापनदिनानिमित्त तर अनेक संस्था सोबतीला आल्या आहेत. त्यामुळे अभियानाची ताकद वाढली आहे.
स्वच्छता अभियानाला पाच वर्षे पूर्ण होत आहेत. तसेच या पाच वर्षांत अनेकजण सहभागी झाले आणि स्वच्छतादूत बनले आहेत. आम्ही आता सर्व शैक्षणिक संस्थांना, सेवाभावी संस्थांना, सामाजिक संस्था, बायकर्स आणि सायकलिंग ग्रुप्स यांना यात सहभागी होण्यासाठी आवाहन आहे. त्यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.- विंग कमांडर पुनीत शर्मा, स्वच्छ भारत स्वच्छ पुणे
या ठिकाणी बुधवारी स्वच्छता मोहीमगांधी जयंतीनिमित्त उद्या (दि.२) शहरात अनेक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये विठ्ठलवाडी, बाबा भिडे पूल, सिध्देश्वर घाट, बंड गार्डन, कोरेगाव पार्क, मुंढवा, राजीव गांधी पूल औंध, रामवाडी, पवना आदी ठिकाणांचा समावेश आहे.