शिबिराचे उद्घाटन सभापती दिनकर सरपाले, उपसभापती अनंता दारवटकर व जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे, दिनकर धरपाळे यांच्या हस्ते करण्यात आले. रामराज्य प्रतिष्ठान वेल्हे तालुका यांच्या वतीने शहीद जवान दत्तात्रय गायकवाड यांच्या स्मरणार्थ विंझर येथील अमृतेश्वर महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील युवकांनी या रक्तदान शिबिरात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. कोविडच्या काळात रक्ताचा पुरवठा कमी पडत असल्याने आणि आगामी तिसऱ्या लाटेचा विचार करत रक्ताची गरज ओळखून रामराज्य प्रतिष्ठानकडून काँग्रेसचे युवक अध्यक्ष शिवराज शेंडकर, उपाध्यक्ष गणेश जागडे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवराज शेंडकर,उपाध्यक्ष गणेश जागडे, संतोष माजी सरपंच संभाजी भोसले, सतीश लिम्हण, रामराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षय पिसे, शुभम भोसले, स्वराज लिम्हण, अभिषेक गायकवाड, प्रितम करंजकर, अभिषेक करंजकर,ब्लड बॅंक पुणेचे डॅा. डांगे, रुग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते.
विंझरमध्ये ५२ जणांनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 4:16 AM