कोरोना परिस्थिती आणि लॉकडाऊनचे नियम यामुळे सामाजिक उपक्रमांना मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे रक्तदान शिबिरांची संख्या व रक्तदात्यांची संख्या घडली आहे. त्यामुळे रक्ताचा तुटवडा काही प्रमाणात भरून काढण्यासाठी विंझरमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. विंझर येथील अमृतेश्वर कला व वाणिज्य विज्ञान महाविद्यालय येथे शिबिर झाले. या शिबिरास तालुक्यातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. येथील युवकांनी या ठिकाणी येऊन ५७ युवकांनी रक्तदान केलेले आहे अभिषेक वैराट, प्रकाश सरपाले, किरण खोपडे, आकाश जाधव, निखिल जाधव, प्रतीक जाधव, कुणाल जाधव, ओमकार ननावरे, सनी सरपाले, गणेश लिमन आदी कार्यकर्त्यांनी रक्तदानासाठी विशेष सहकार्य केले.
--
फोटो क्रमांक: २८मार्गासनी विंझर रक्तदान शिबिर.
फोटो क्रमांक - विंझर येथील रक्तदान शिबिरात सहभागी झालेले युवक.
===Photopath===
280521\28pun_14_28052021_6.jpg
===Caption===
फोटो क्रमांक: २८मार्गासनी विंझर रक्तदान शिबीरफोटो क्रमांक - विंझर येथील रक्तदान शिबीरात सहभागील जालेले युवक