पुणे : तंतूवाद्याच्या सुरेल तारा छेडत रसिकांच्या हृदयाचा अलगदपणे ठाव घेणारे ख्यातनाम कलाकार उस्ताद शाहीद परवेज अन् आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तबलावादक पं. विजय घाटे यांच्या अनोख्या जुगलबंदीने रसिकांची दिवाळी पहाट सुरेल रंगात न्हाऊन निघणार आहे. सोबतीला तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेल्या गायक महेश काळे यांच्या स्वरांची उधळण रसिकांवर होणार आहे. सप्तसुरांच्या आविष्कारांनी सजलेली ही ‘स्वरचैतन्या’ची मैफल रसिकांसाठी पर्वणीच ठरणार आहे.
पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत ‘लोकमत’च्या वतीने बुधवारी (दि. २६) पहाटे ५.३० वाजता कर्वेनगर येथील महालक्ष्मी लॉन्स येथे आयाेजित ‘स्वरचैतन्या’च्या मैफलीने रसिकांचा पाडवा गोड होणार आहे. या कार्यक्रमाला कोहिनूर, लोकमान्य मल्टिपर्पज कॉ. सोसायटी, व्हिजन, आयव्ही युनिव्हर्स, पीएनजी आणि सूर्यदत्ता ग्रुप यांचे विशेष सहयोग लाभले असून, रांजेकर, सिद्धी असोसिएटस, काका हलवाई स्वीट सेंटर, सुरभी, एआयएसएमएस आणि मनोहर सुगंधी यांचे सहकार्य लाभले आहे.
दिवाळीनिमित्त शहरात विविध ठिकाणी पाडव्याच्या दिवशी असंख्य दिवाळी पहाटचे आयोजन करण्यात येते. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलाकार अन् रसिकांचे पुष्प, अत्तर अन् रंगावलीद्वारे केले जाणारे आगळेवेगळे स्वागत या वैशिष्ट्यांमुळे रसिकांना ‘लोकमत’च्या पाडवा दिवाळी पहाटची चातकाप्रमाणे प्रतीक्षा असते. यंदाही अशाच दर्जेदार कलाकारांची स्वरमैफल घेऊन लोकमत रसिकांच्या भेटीला येत आहे. ही ‘स्वरचैतन्या’ची मैफल रसिकांसाठी सुरेल मेजवानी ठरणार आहे.
खालील केंद्रांवर मिळणार विनामूल्य प्रवेशिका
- काका हलवाई स्वीट सेंटर- चित्रलेखा अपार्टमेंट आयडियल कॉलनी, प्रेस्टीज कॉर्नर गणेशनगर रोड. नवसह्याद्री अलंकार पोलीस स्टेशनशेजारी. आयुर्वेद रसशाळेसमोर कर्वे रोड एरंडवणे. सुखयानी प्रेस्टीज, मेरिडियन आइस्कीमशेजारी. सागर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, जी ११, डेस्टिनेशन सेंटर नांदेड सिटी.- खत्री बंधू पॉट आइस्क्रीम आणि मस्तानी- न्यू फ्रेंडस कंपनी पौड रोड, अनंत कृपा सोसायटी, लोकमान्य कॉलनी कोथरूड. विठ्ठल मंदिरासमोर, मधुसंचय सोसायटी, कर्वेनगर. गोयल गंगा हाऊसिंग सोसायटी, खाऊ गल्ली, माणिकबाग.- लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लिमिटेड- श्रेयस अपार्टमेंट, नवीन डीपी रोड, गुरू गणेशनगर कोथरूड. सेनापती बापट रोड, रत्ना हॉस्पिटलशेजारी, मॉडेल कॉलनी. बांदल कॅपिटल. पौड रोड. केसरीवाडा, नारायण पेठ. एस. एम जोशी फाउंडेशन, पत्रकार भवन शेजारी गांजवे चौक. मीना सोसायटी, इंद्रनगरी, डहाणूकर कॉलनी, कोथरूड.- रसिक साहित्य, आप्पा बळवंत चौक.- बालगंधर्व नाट्यगृह.- यशवंतराव चव्हाण नाट्यगृह.* लोकमत कार्यालय- सिहंगड रोड आणि लॉ कॉलेज रोड.* सिद्धी असोसिएटस- ७५२ कुमठेकर रोड, पेरूगेट सदाशिव पेठ.* मनोहर सुगंधी - हरिवंश बिल्डिंग, अकरा मारूती कोपरा, शिंदे आळी, शुक्रवार पेठ. मारणे हाईटस, महात्मा फुले मंडई, टिळक पुतळ्याजवळ मंडई. तानाजी चौक, शिवाजी पुतळ्याजवळ, कोथरूड गावठाण, कोथरूड.* पीएनजी ज्वेलर्स-६९४ पी एनजी हाऊस, कुंटे चौक, लक्ष्मी रोड. कॉमन अवेन्यू, पौड रस्ता, आयडियल कॉलनी, कोथरूड.* महालक्ष्मी लॉन्स- राजाराम पुलाजवळ, कर्वेनगर.