पुणे : अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) गेल्या वर्षभरात शहर आणि जिल्ह्यातून गुटखा, पानमसाला आणि सुगंधित सुपारीचा तब्बल पावणेसात कोटी रुपयांचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी २७ वाहने जप्त करण्यात आली असून, तब्बल १८ गोदामे व दुकाने सीलबंद करण्यात आली आहेत.राज्यात मागील काही वर्षांपासून गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू आणि सुपारीवर बंदी आहे. दरवर्षी या बंदीची मुदत वर्षभरासाठी वाढविण्यात येते. या वर्षी ही मुदत संपल्याने एफडीएने दि. २० जुलै रोजी बंदीला एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. गुटखाबंदीला सहा आणि सुगंधित सुपारीवरील बंदीला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. यानंतरही शहरात अवैधमार्गाने मोठ्या प्रमाणावर गुटखा आणि पानमसाला सर्रासपणे मिळताना दिसतो. त्यामुळे एफडीएकडून संबंधितांवर सातत्याने कारवाई केली जाते. मागील वर्षभरात एफडीए आणि पोलिसांनी मिळून गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणावर गुटख्याचा साठा जप्त केला आहे.एफडीएने शहरात गुटखाविक्री तसेच साठा करणाऱ्यांवर स्वतंत्रपणे ७७ आणि पोलिसांच्या सहकार्याने ५८ अशा एकूण १३५ आणि जिल्ह्यात ७५ कारवाया केल्या आहेत. या कारवाईत शहरातून १ कोटी १५ लाख ७७ हजार ६८९, तर जिल्ह्यातून ६ कोटी ८० लाख ७४ हजार ९०८ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. गुटख्याच्या अवैध वाहतूकप्रकरणी २७ वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत. न्यायालयात या प्रकरणी शहर परिसरातून २७ आणि जिल्ह्यात ३८ खटले दाखल करण्यात आले आहेत.वारंवार गुटखा तस्करीचे गुन्हे करणाºया ८ व्यक्तींविरोधातमहाराष्ट्र प्रिव्हेंशन आॅफ डेंजरस अॅक्टिव्हिटिज (एमपीडीए) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती एफडीएतील अधिकाºयांनी दिली.वर्षभरातील मोठ्या कारवाया१६ मार्च २०१८ रोजी खेड येथे अहमदाबाद येथून आलेला तब्बल २ कोटी ३२ लाख ८० हजार रुपयांचा ४ ट्रक गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखू जप्त. एफडीए आणि पोलिसांकडून संयुक्तपणे कारवाई.मार्च २०१८ मध्ये खेडमधील खुरली येथे ३२ लाख ८० हजार रुपये किमतीचा पानमसाला आणि सुगंधित सुपारीचा साठा जप्त.पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पुणे विभागात ३०१ ठिकाणी केलेल्या कारवाईत ११ कोटी २६ लाख ३२ हजार रुपयांचा साठा जप्त.
वर्षभरात पावणेसात कोटींचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 12:15 AM