"काँग्रेस शिवाय संपूर्ण देशालाच पर्याय नाही, आमच्याकडून स्वबळावर लढण्याची तयारी सुरू", - नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 02:31 PM2021-06-20T14:31:13+5:302021-06-20T14:32:29+5:30

महाराष्ट्रात ठाकरे सरकार काँग्रेससोबतच असून कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट

"Without Congress, the whole country has no choice. We are preparing to fight on our own." | "काँग्रेस शिवाय संपूर्ण देशालाच पर्याय नाही, आमच्याकडून स्वबळावर लढण्याची तयारी सुरू", - नाना पटोले

"काँग्रेस शिवाय संपूर्ण देशालाच पर्याय नाही, आमच्याकडून स्वबळावर लढण्याची तयारी सुरू", - नाना पटोले

Next
ठळक मुद्देमोदींनी अमेरिकेतल्या निवडणूकीवेळी ट्रम्प ला भारतात बोलावून लाखोंची जमवलेली गर्दी कोरोनाच्या फैलावला प्रामुख्याने कारणीभूत ठरली

पुणे: पंत्रप्रधान नरेंद्र मोदी या दाढीवाल्यांनी सामान्य लोकांना नोटबंदीवेळी लाईनमध्ये लावून मारल. देशात तेव्हापासूनच महागाई वाढू लागली आहे. आता देशाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी काँग्रेसशिवाय पर्याय नसेल. असा विश्वास राज्याचे काँगेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रविवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आहे. काँगेसने आता मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची भूमिका घेतल्यानंतर आता राज्यतील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका देखील स्वबळावर लढविली जाणार आहे. काँगेस तशी तयारी देखील सुरु केले असल्याचे ते यावेळी म्हणाले आहेत. 

कोथरुड येथील नगरसेवक चंदू कदम यांच्यावतीने पाच हजार महिलांचे मोफत लसीकरण मोहिमेचे उद्धाटन रविवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी विश्वजित कदम, मोहन जोशी आदी उपस्थित होते.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात अनेकांचे प्राण गेले. कोरोनाबाबत केंद्रांचे नियोजनच चुकल्याने हे संकट वाढत गेले. मोदींनी अमेरिकेतल्या निवडणूकीवेळी ट्रम्प ला भारतात बोलावून लाखोंची जमवलेली गर्दी कोरोनाच्या फैलावला प्रामुख्याने कारणीभूत ठरली असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

महाराष्ट्रात ठाकरे यांच्यासोबतच काँग्रेस राहणार 

सर्व पक्षांना आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे स्वबळावर लढणे हे काय चुकीचे नाही. तसेच आपण उद्धव ठाकरे यांच्या सोबत असून सरकारला कोणताही धोका नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

महाराष्ट्रातून भाजपला काँग्रेसच दाखवू शकतं. नाना पटोले यांनी विदर्भ दौरा केला तसा संपूर्ण महाराष्ट्राच्या तळागाळात करावा अशी इच्छा पतयेक कार्यकर्त्याची आहे. पुणे महापालिकेत ही काँग्रेसचीच सत्ता आणायची आहे. असे विश्वजीत कदम यावेळी सांगितले आहे. 

Web Title: "Without Congress, the whole country has no choice. We are preparing to fight on our own."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.