शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

पुण्यात सादरीकरणाचा अद्वितीय आनंद : महेश काळे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 10:00 PM

महेश काळे आपल्या बहारदार गायकीने रसिकांची दिवाळी पहाट संस्मरणीय करणार आहेत ..

ठळक मुद्दे28 ऑक्टोबर रोजी पहाटे 5.30 वाजता महालक्ष्मी लॉन्स येथे ‘लोकमत स्वरचैतन्य दिवाळी पहाट’ रंगणार शेवटी रसिकांच्या अंतर्मनाला संगीताची लय जाणवणे जास्त महत्त्वाचे

पुणे : कोणताही गायक राग, त्याच्यातील सौंदर्य उलगडताना वेगवेगळ्या हरकती, ताना, आलापी यांचे सादरीकरण करतो. मात्र त्या कलेचा आनंददेखील तितकाच महत्त्वाचा असतो आणि संगीताशिवाय सात्त्विक आनंद दुसरा कशातचं मिळत नाही. तरुणाईला हवे असणारे, त्यांच्याशी संवाद साधणारे, त्यांना आपलेसे करणारे संगीत निर्माण करण्याची गरज आहे. संगीत व गायकीच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहचता येते, संवाद साधता येतो हा जणू एक आशीर्वादच असल्याचे मानतो. पुण्यात सादरीकरणाचा मला कायमच अद्वितीय आनंद मिळतो, अशी भावना प्रसिद्ध युवा गायक महेश काळे यांनी व्यक्त केली. 

युवराज ढमाले कॉर्प प्रस्तुत आणि डॉ. सागर गणपतराव बालवडकर यांच्या सहयोगाने दि. २८ ऑक्टोबर रोजी पहाटे ५.३० वाजता महालक्ष्मी लॉन्स येथे ‘लोकमत स्वरचैतन्य दिवाळी पहाट’ रंगणार आहे. यात महेश काळे आपल्या बहारदार गायकीने रसिकांची दिवाळी  पहाट संस्मरणीय करणार आहेत. कार्यक्रमाला रांका ज्वेलर्स आणि लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप सोसायटीचे सहकार्य लाभले आहे. याशिवाय काका हलवाई स्वीट सेंटर, खत्री बंधू पॉट आईस्क्रीम व मस्तानी, सूर्यदत्ता ग्रृप ऑफ इन्स्टिट्यूट, उर्जा, लक्ष्मीनारायण चिवडा, आदिनाथ अ‍ॅग्रोचे सुरभी हे सहयोगी प्रायोजक आहेत. धीरेंद्र अँडव्हर्टाईजिंग हे आऊटडोअर पार्टनर आहेत. यंदाच्या लोकमत स्वरचैैतन्य दिवाळी पहाटमध्ये प्रसिद्ध बासरीवादक राकेश चौरसिया यांच्या समवेत मैफल सादर करण्याचा अनुभव काहीसा विलक्षण असणार आहे. त्यामुळे खूप उत्सुकता लागली असल्याचे त्यांनी सांगितले.‘लोकमत’शी संवाद साधताना महेश काळे म्हणाले, ‘विजयाचा उत्सव म्हणजे दिवाळी. हा आनंद साजरा करण्यासाठी गोड पदार्थाने तो आनंद द्विगुणित करतो. हल्ली त्याला फटाक्यांचा मोठा आवाजाने गालबोट लागत आहे. ध्वनी, वायुप्रदूषणाने त्याचे स्वरुप गंभीर होत चालले आहे. एकीकडे सणासुदीचे हे चित्र दिसत असले तरी सप्तसूरांची मनसोक्त उधळण करीत संगीताचा परिस्पर्शानेही रसिकांची दिवाळी अविस्मरणीय ठरत आहे, ही देखील एक जमेची बाजू आहे.  गायक मैफलीत कलेचे सादरीकरण करतो म्हणजे नक्की काय करतो तर  सूर, लय, तालाच्या माध्यमातून तो श्रोत्यांशी संवाद साधत असतो. गायकाला आपल्या संस्कृतीतील बंध जपण्याचे काम गाण्यातून करायचे असते. त्या त्या भौगोलिक परिवेशाला सांस्कृतिकतेचे वेगळे परिमाण देण्यात गाण्याचा वाटा मोठा आहे. त्याकरिता कलेची साधना महत्त्वाची आहे, असेही त्यांनी सांगितले.

...............

पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. या शहरात दिवाळीच्या रम्य दिवसांमध्ये दिवाळी पहाटसारखा अत्युच्च आनंद देणारा संगीत कार्यक्रम आयोजित होतो आणि हजारो पुणेकर संगीताचा आनंद लुटतात, ही बाबच दिवाळीची गोडी अनेक पटीने वाढवणारी आहे. दर्जेदार कलाकारांच्या सादरीकरणामुळे दिवाळीचे कलात्मक मूल्य वाढते. ‘लोकमत’च्या अशा अभिजात उपक्रमामध्ये सहभागी व्हायला मिळणे ही माझ्यासाठी व्यक्तिगत आनंदाची बाब आहे. यंदाच्या -‘लोकमत दिवाळी पहाट’ला रसिकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन मी पुणेकरांना करतो. सलग तीन वर्षे दिवाळी पहाटच्या माध्यमातून ‘लोकमत’ समवेत पुणेकरांना सांस्कृतिक मेजवानी देताना आनंद होत आहे. - युवराज ढमाले, व्यवस्थापकीय संचालक, युवराज ढमाले कॉर्पोरेशन 

............... 

मोफत प्रवेशिका खालील ठिकाणी आज दुपारी २ वाजल्यापासून उपलब्ध रांका ज्वेलर्स केंद्र, लक्ष्मी रोड •कर्वे रस्ता •सिंहगड रस्ता ,रविवार पेठ.  लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी, शाखा : डहाणूकर कॉलनी, सेनापती बापट रस्ता, कर्वेनगर, नवी पेठ , सिंहगड रोड,  रसिक साहित्य: अप्पा बळवंत चौक ,बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह 4काका हलवाई स्वीट सेंटर: * आयुर्वेदिक रसशाळेसमोर, कर्वे रोड शॉप नं. 2, चित्रलेखा अपार्टमेंट, आयडियल कॉलनी, पौड रोड- शॉप नं. 1, अलंकार पोलीस चौकी, नवसह्याद्रीे. अभिनव कला महाविद्यालयजवळ, टिळक रोड,  खत्री बंधू पॉट ऑइस्क्रीम व मस्तानी : विठ्ठल मंदिर कॉर्नर, कर्वेनगर. गंगाधाम भाग्योदय अपार्टमेंट, सिंहगड रोड. शिवाजी पुतळा चौक, कोथरूड. लोकमत कार्यालय: व्हिया व्हेंटेज बिल्डिंग, लॉ कॉलेज रोड.  वडगाव कार्यालय: वडगाव खुर्द, सिंहगड रोड.

टॅग्स :PuneपुणेMahesh Kaleमहेश काळे