उप प्रादेशिक परिवहन कार्यालय : भरमसाट पैसे देऊनही करावी लागते दलालांची मनधरणी
पिंपरी : विविध कामकाजात ऑनलाईन पद्धत राबवण्याची योजना, अधिकारी कर्मचा:यांची नेमणूक, असे असतानाही उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दलालांशिवाय कामच होणार नाही. अशी, वेगळी ओळखच कार्यालया विषयी नागरिकांच्या मनात बसली आहे. प्रभाकर, विलास, नितीन, विनोद या व्यक्तींच्या हातावर दक्षिणा ठेवल्याशिवाय कोणतेही काम करणो अशक्य आहे.
पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये शिकाऊ वाहन परवाना, पक्के परवाना, नवीन वर्गाचा परवाना, नुतनीकरण, दुय्यम प्रत, नवीन वाहनाची नोंदणी, वाहनांचे हस्तांतरण, ना हरकत प्रमाणपत्र, योग्यता प्रत्र, अशी विविध कामे येथे केली जातात. शिकाऊ वाहन परवाना काढण्यासाठी 31 रुपये शासकीय शुल्क आहेत. त्यासाठी येथे 3क्क् रुपये घेतले जातात. वाहनाच्या नंबरसाठी येथे वेगवेगळे शुल्क आहे. मात्र शासकीय शुल्कापेक्षा अधिक पैसे हे उकळत असतात. वाहन योग्यता प्रमाणपत्रसाठी 1क्क् रुपये शुल्क असताना दलाल मात्र, 5 ते 1क् हजार रुपयार्पयत पैसे घेतात. तर, बोजा नोंदविण्यासाठी 394 रुपये शुल्क आहेत. हे चार ते पाच हजार रुपये घेतात. अशा पद्धतीने नागरिकांकडून पैसे उकळले जात आहेत.
अनेक दलाल मागील 2क् वर्षापासून काम करत आहेत. त्यामुळे कार्यालयातील सगळ्य़ा बारीक सारीक गोष्टी त्यांना माहीत झाल्या आहेत. प्रत्येक विभागात मुक्त वावर असल्याने प्रत्येकाचा स्वभाव आणि काम करण्याची पद्धत त्यांना माहित आहे. वाहनाचे ना हरकत प्रमाणप्रत्र, बोजा चढविणो, वाहन हस्तांतरण, योग्यता प्रमाणपत्र काढण्याचे काम रखडले असेल तर, स्वत: प्रयत्न करणा:या नागरिकांना कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते. हे संबंधिताना पुरते उमगते. या कामामध्ये कोणतेही कागदपत्रे कमी पडत असतील, तर त्यांना ते सांगण्यात येत नाहीत. अनेक दिवस कार्यालयात येऊन त्यांच्या हाती काहीच लागत नाही. काम होत नाही, व दररोज माराव्या लागणा:या चकरा याला नागरिक कंटाळून जातात. काम होत नाही, हे पाहून मग त्यांचा शोध सुरु होतो दलालांच्या दिशेने, कर्मचा:यांच्या पाठबळामुळे यांचा उद्य झाला आहे. कार्यालयातून कोणतेही काम करुन घ्यायचे असल्यास यांच्या शिवाय पर्याय नाही, ही भावना नागरिकांमध्ये बळावत चालली आहे.
गाडी नावावर करायची असेल, ना हरकत प्रमाणपत्र काढायचे असेल, बोजा चढवणो, योग्यता प्रमाणपत्र निघत नसेल वाहन दुस:या राज्यातील असेल तर अशा वाहनासाठी काय करायचे याचा सल्ला घेण्यासाठी व काम लवकर होण्यासाठी कोणता पर्याय वापरता येईल याचे मार्गदर्शन करण्यासाठी ही मंडळी सरसावतात. काम लवकरात लवकर करुन देण्यासाठी व्यक्तीकडून मनमानी पद्धतीने 5 ते 1क् हजार रुपये घेतले जातात.
अवघड काम आहे, लवकर होणार नाही. त्यासाठी साहेबांनाही काहीतरी द्यावे लागते, तेव्हा सही होते. अनेक कागद पत्रे कमी आहेत. ते कोणाचेच काम लवकर करत नाही. तुम्ही गेलात, तर काम होणार नाही. हे आमचे साहेबांकडे रोजच कामे असतात. त्यामुळे साहेब आमच्यांकडूनच घेतात आणि काम करुन देतात. त्यातही त्यांना मॅनेज करावे लागते. एवढे सोपे नाही, ते अशा भूलथापा मारून हे नागरिकांना गंडवीत आहेत. पैसे दिल्यानंतरही आपल्या कामात दिरंगाई होत असल्याचे अनेक तक्रारदार असतात. पण त्यांना अरेरावीचे उत्तर मिळते. माङयाकडे अनेक कामे आहेत. आणि तुमची फाईल साहेबांच्या टेबलावर आहे. ते सही करतील तेव्हा होईल तुमचे काम असे अनेक उपप्रश्न करुन ते येणा:या नागरिकांनाच उलट बोलणार, व आले तसे मागारी पाठवणार त्यावेळी त्यांना पार्याय नसतो. पोकळ आश्वासनांखेरीज त्यांच्या पदरी काहीच पडत नाही.
कार्यालयातील बडय़ा अधिका:यांनी याकडे दुर्लक्ष केले
आहे. त्यामुळे तळातील काही
कर्मचारी तसेच दलालांचे चांगलेच फावले आहे. वरिष्ठ अधिका:यांना याचा थांगपत्ता लागत नाही, हे
मोठे नवलच आहे. त्यामुळे हे दलाल पोसले जातात. (प्रतिनिधी)
स्वत:चे कार्यालय आणि कर्मचारी
दलाल व त्याचे इतर सहकारी समांतर परिवहन कार्यालयच चालवत असल्याचे दिसते. कार्यालयाच्या आवारात आणि तळ मजल्यावर त्यांनी कार्यालय चालू केले आहे. पाच सहा माणसे हाताखाली, संगणक, कागद पत्रंचे गठ्ठे, आठ-दहा खुच्च्र, शिक्के नियमीत नागरिकांची वर्दळ, असे प्रतिकार्यालयच सुरु केले आहे. यातील काही जण जुने असल्याने त्यांनी आता नवीन साथीदार शिकवण्याचे कामही चालू केले आहे.
अर्जासाठी नागरिकांची अडवणूक
कार्यालयामध्ये अनेक अर्ज मिळत नाही. तिथले अर्ज कधी संपलेले असतात, तर कधी कमी असतात. दलाल अर्जाचे दाम दुप्पट करतात. एक रुपयाच्या अर्जाचे हे 1क् ते 2क् रुपये घेतात. एवढे पैसे म्हटले, तर ते अर्ज देत नाहीत. जा कोणाकडे मिळतो अर्ज असे म्हणून हाकलून लावतात. सगळे अर्ज दलालांकडेच मिळतात.
दलालांकडून आले की सोपे
दलालांकडून आले की लगेच परवाना, कारण त्यांचे सबंध असल्याने हे काम लवकर केले जाते. दलालांचे काही कोड शब्द असतात. तर काही वेळा सही केलेली असते. त्यावरुन त्या व्यक्तीचे लगेच काम पूर्ण केले जाते.
कार्यालयात मुक्त वावर
दलालांचा कार्यालयामध्ये मुक्त वावर असतो. प्रत्येक विभागामध्ये ते साहेबासारखे वावरतात. कोणतेही कागद स्वत: हाताळणार कुठेही शिक्के मारायचे असेल, तर कर्मचा:याची गरज नाही, हे स्वत:सगळे शिक्के मारुन सही करण्यासाठी पुढे करणार, हे सगळे प्रकार कर्मचारी पाहत असतात, त्यांना रोखण्याऐवजी ते प्रोत्साहनच देतात. पैसे भरण्यासाठी हे मागच्या दारातून जातात, नागरिकांना मात्र रांगेत उभे रहावे लागते. टेबलावरही हे फाईली ठेवतात, आणि हक्काने साहेबांना सही करा, असे सांगतात.
येणा:यांच्या भोवती गराडा
कोणतीही व्यक्ती कार्यालयाच्या आवारात आली तरी सगळे त्याला गराडा घालतात, काय काम आहे. कागद पत्रे दाखवा असे विचारुन होणार की नाही हे लगेच सांगतात. त्यामुळे आलेली व्यक्ती गोंधळून जाते. आणि विचारते तुम्हीच मार्ग सुचवा, मग हे बाजूला घेऊन मार्ग सांगतात. कागद हातात घेणार आणि म्हणार द्या पाचशे रुपये. अशा पद्धतीने लूट केली जात आहे.
नितीन
4लाईनींगचे शर्ट, इनकेलेले. पायात काळा बुट साधाराण, पन्नशीतील व्यक्ती, स्वभावाने मनमिळावू . त्यांचे तळ मजळ्य़ावर कार्यालय आहे. कार्यालयात चार पाच खुच्र्या टाकलेल्या असतात. हाताखाली तीन कर्मचारी आहेत. ते आलेल्या नागरिकांना माहिती देत असतात. एखादे काम अडलेले असले, तरच हे लक्ष घालतात. काम करताना सरळ साहेबांच्या कार्यालयात जाणार, तिथे बसूनच आपल्या हाताखालील माणसाला हे काम सांगत असतात. जा सह्या घेऊन ये, शिक्के मारुन आण, आणि सगळ्य़ांना माङो नाव सांग असे सांगतात. हे परवाना, वाहनाचे हस्तांतरण, ना हरकत प्रमाणपत्र अशी कामे करतात. परवाना काढून देण्यासाठी यांचा रेट ठरलेला आहे. परवाना 1क्क्क् रुपये. वाहन हस्तांतरणामध्ये अडकलेले प्रमाणपत्र आणि कागद पत्रे कमी असतील तर 1क् हजार रुपये घेतले जातात.
प्रभाकर
4दिसायला काळासावळा, साहेबांसारखा वावर,पायात स्पोर्ट शुज, साधा शर्ट, बोलायला अतिशय प्रेमळ, कार्यालयाच्या आवारात येताच, हे आपल्या चारचाकी वाहनातून उतरतात, उतरताना दुस:या मजल्यावरील साहेबांच्या कार्यालयात जाणार कर्मचारी आणि अधिका:याची चौकशी करणार, नंतर येऊन ते स्वत:च्या तळमल्यावरील कार्यालयात बसतात. त्याच्याकडे जास्तीत जास्त कामे ही वाहनाचे ना हरकत प्रमाणपत्र आणि परवाना काढण्याची असतात. ते वाहनाचे हस्तांतरण करण्याची व्यक्ती आणि काम पाहून पैसे घेतात. 1क् हजारार्पयतही पैसे आकारतात.
विलास
4कार्यालयातील विलासी थाटा सासरखाच यांचा विलास स्वत:चे स्वतंत्र कार्यालय त्यामध्ये चार जण हाताखाली, आराम खुर्चीत बसून हुकू म सोडतात. ते सकाळी साधारण 1क्.3क् च्या सुमारास कार्यालयाच्या आवारात आले. ते वाहन परवाना आणि इतर कामेही करतात. अतिशय जुन्या फळीतील असल्याने बारीकसारीक गोष्टी त्यांना माहित आहेत. त्यामुळे ते जागेवर बसूनच आपल्या माणसाकरवी सगळी कामे करुन घेतात.
विनोद
4बोलण्यात वात्रंट, हिंदी आणि मराठी एकसोबत बोलत असल्यामुळे बोलणो विनोदी व खोचक आहे, अनुभव मोठा आहे डोक्याचे केस पांढरे आहेत, बोलणो थोडे वाकडे असले तरी समोरच्याच्या खिशातून पैसे काढण्यात पटाईत असलेला विनोद. बोलण्यातला विनोदी पणा आणि खोचक स्वभाव यामुळे तो वरिष्ठ अधिका:यांच्या मर्जीतील असावा. परिवहन विभागातील फाईली अधिका:यांच्या टेबलावर आणि त्याचे कामात रुपांतर करुन घेण्यात तो पटाईत असल्याचे दिसून आले.