शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

गुंगीचा पेढा देऊन महिलेला लुबाडले

By admin | Published: November 26, 2014 11:46 PM

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने पेढा देऊन महिलेला मुलासह गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध करून ठाण्याच्या बसमध्ये बसवून दिल्याचा धक्कादायक प्रकार वारजे येथे घडला.

पुणो : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने पेढा देऊन महिलेला मुलासह गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध करून ठाण्याच्या बसमध्ये बसवून दिल्याचा धक्कादायक प्रकार वारजे येथे घडला.  ही महिला तब्बल सहा तास बेशुद्ध होती. या महिलेच्या गळ्यातील दागिने भामटय़ाने लंपास केले. 
शीतल मंगेश कुलकर्णी (वय 32, रा. वारजे माळवाडी) यांच्यावर सोमवारी हा प्रसंग गुदरला. त्यांनी वारजे पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास कुलकर्णी या मुलाला घेऊन अतुलनगरला चुलतभावाकडे जात होत्या. महामार्गालगत सव्र्हिस रस्ता ओलांडून त्या सागर हॉटेलसमोर आल्या. त्या वेळी तोंडाला रुमाल बांधलेला व गॉगल घातलेला एक जण त्यांच्याजवळ आला. ‘मुंबईला जाणारी बस कुठे मिळेल? शिवाजीनगरला मिळेल का?’ अशी विचारणा केली. कुलकर्णी यांनी चांदणी चौकात बस मिळेल, असे सांगितले. त्यांना धन्यवाद देत त्या भामटय़ाने  पेढा खायला दिला. निम्मा पेढा मुलाला देऊन उरलेला पेढा त्यांनी खाल्ला. पेढा खाल्ल्यानंतर दोन ते तीनच मिनिटांत त्यांना गुंगी आली. आरोपीने त्यांना जवळच उभ्या असलेल्या रिक्षात बसवले. त्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांना शुद्ध आली. तेव्हा  ठाणो येथील वंदना एसटी बस आगारामध्ये असल्याचे त्यांना समजले. त्यांचा मुलगाही त्यांच्या सोबतच होता. काही वेळातच त्यालाही शुद्ध आली. त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र व कर्णफुले असा एकूण 21 हजार 6क्क् रुपयांचा ऐवज अंगावर नव्हताच. कुलकर्णी यांनी मोबाईलवरून पतीशी संपर्क साधून त्यांना सर्व घटना सांगितली.  पतीनेही तातडीने एसटी महामंडळात नोकरीला असलेल्या एका नातेवाइकाला मोबाईलवर संपर्क साधून घटना सांगितली. या नातेवाइकाने तातडीने ठाण्यामध्ये जाऊन या दोघांनाही पुण्यामध्ये आणले. सोमवारी रात्री उशिरा पुण्यात आलेल्या कुलकर्णी यांनी पतीसह मंगळवारी वारजे पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली. (प्रतिनिधी)
 
सीसीटीव्ही फुटेज शोधण्याचा प्रयत्न
आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी मिळवण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांना फुटेज मिळाले नाही. ज्याने गुंगीचे औषध दिले, त्याला रिक्षाचालकाची मदत झालेली आहे. ही रिक्षा कुठे उभी करण्यात आली, दागिने नेमके कुठे काढून घेतले याचा तपास करण्यासाठी रिक्षाचालकाला शोधण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. ठाण्याच्या एस. टी. स्थानकातील फुटेज मिळवण्याचा पोलिसांचा प्रयत्न असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक म्हामुनकर यांनी सांगितले.