शहरं
Join us  
Trending Stories
1
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
2
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
3
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
5
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
7
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
8
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
9
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
10
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
11
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
12
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
13
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
14
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
15
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
16
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
17
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
18
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
19
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
20
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई

विनयभंगाच्या तक्रारी नोंदविण्यासाठी महिला येताहेत धाडसाने पुढे ; १० महिन्यांत ४३० तक्रारी 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2018 11:42 AM

सार्वजनिक ठिकाणी महिलांची होणारी छेडछाड ही आत्तापर्यंत नित्याचीच होती. शेरेबाजीपासून स्पर्शापर्यंत मजल गेली तरी महिला मान खाली घालून जात होत्या. मात्र,

ठळक मुद्देआता सहन करणार नाहीचा नारा : जागृतीचा परिणाम४३० विनयभंगाच्या तक्रारी नोंदविण्यात आल्या होत्या़. त्यापैकी ४२४ गुन्ह्यातील आरोपी उघड

विवेक भुसे पुणे : ‘मी टू’ सारख्या मोहिमा ,‘गुड टच, बॅड टच’ बाबत शाळा- महाविद्यालयांतून होणारी जागृती आणि पोलिसांकडून मिळणाºया सकारात्मक प्रतिसादामुळे विनयभंगाच्या तक्रारी दाखल करण्यासाठी महिला धाडसाने पुढे येत आहेत. जानेवारीपासून पुण्यात ४३० तक्रारी नोंदविण्यात आल्या होत्या. त्यापैैकी ४२४ घटनांतील आरोपींना पकडण्यातही आले. सार्वजनिक ठिकाणी महिलांची होणारी छेडछाड ही आत्तापर्यंत नित्याचीच होती. शेरेबाजीपासून स्पर्शापर्यंत मजल गेली तरी महिला मान खाली घालून जात होत्या. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. २५ नोव्हेंबर या जागतिक महिला हिंसाचार प्रतिबंधक दिवसानिमित्त ‘लोकमत’ने पुण्यातील छेडछाडीच्या प्रकारांचा आढावा घेतला. विनयभंगाची तक्रार देण्यासाठी धाडसाने पुढे आलेल्या महिलांशी संवाद साधला. ‘सोसायचे नाही, लढायचे’ असे महिला म्हणत असल्याचे यातून दिसून आले. यावर्षी जानेवारीपासून १९ आॅक्टोंबरपर्यंत पुणे शहरात ४३० विनयभंगाच्या तक्रारी नोंदविण्यात आल्या होत्या़. त्यापैकी ४२४ गुन्ह्यातील आरोपी उघड झाले असून हे प्रमाण ९९ टक्के इतके आहे़ २०१७ मध्ये ४१५ विनयभंगाच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या़. त्यापैकी ४१० गुन्हे उघडकीस आल्या होत्या़. याच काळात जानेवारी ते १९ आॅक्टोंबर दरम्यान बलात्काराच्या १८२ गुन्ह्यांची नोंद झाली होती़. २०१७ मध्ये २२६ गुन्हे दाखल होते़. २०१७ च्या तुलनेत २०१८ मध्ये ४४ गुन्हे कमी झाले आहेत़. याबाबत एका तक्रारदार महिलेने सांगितले,  पूर्वी पोलीस विनयभंगाच्या तक्रारीकडे फारसे गंभीरपणे पाहत नसत. तक्रार द्यायला गेल्यावर  हे चुकीचे झाले याची जाणीव पोलिसांना झाली आहे़ पोलीस दलात महिलांचे प्रमाण वाढल्याने अशा तक्रारींचा तपास करण्यासाठी महिला पोलिसांकडे जबाबदारी सोपविली जाऊ लागली आहे़. त्यामुळे तक्रारदार मुलगी अथवा महिला आपली तक्रार अधिक स्पष्टपणे त्यांच्याकडे मांडू लागल्या आहेत़. पुणे पोलीस दलाकडे महिला सहाय्य कक्ष चालविला जातो़ या कक्षाच्या माध्यमातून तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलांना धीर दिला जातो. त्यांना बोलते केले जाते. पुण्यातील अनेक ठिकाणी सातत्याने छेडछाडीचे प्रकार घडत होते. एका महिलेने तक्रार दिल्यावर पोलीसांच्या कारवाईने ते बंद झाले, असे एका विद्यार्थिनीने सांगितले. पुरुषी मनोवृत्तीचे प्रमाण ४०टक्क्यांपर्यंतमहिला पोलीस अधिकाºयांनी सांगितले की, महिला कक्षात आलेल्या तक्रारीबाबत पुरुषांचेही म्हणणे जाणून घेतले जाते़ अनेकदा तर आपली शेरेबाजी म्हणजे विनयभंग आहे, त्यातून महिलांमध्ये लज्जा निर्माण होऊ शकते, असे त्यांना वाटत नाही. कायद्याचा बडगा दाखविल्यावर त्यांचे डोळे उघडतात. घरगुती हिंसाचाराच्या तक्रारी वाढल्यामहिला मोठ्या प्रमाणावर नोकरी, व्यवसाय करु लागल्याने त्यात आता आर्थिक दृष्ट्या त्या स्वतंत्र झाल्या आहेत़. पूर्वी पतीने सोडून दिले तर आपले, आपल्या मुलांचे काय होणार या चिंतेने महिला जुळवून घेत असत़. पण आता त्या स्वत: कमावत असल्याने स्वत: तसेच मुलांचे व्यवस्थित संगोपन करु शकत असल्याने आता त्या पुरुषांकडून होणारा अत्याचार सहन करण्यास तयार नसल्याचे चित्र दिसून येत असल्याचे निरिक्षण एका महिला पोलीस अधिकाºयाने नोंदविले. ़़़़़़़़़़पुण्यात २०१७ मध्ये बलात्काराच्या ३४९ गुन्हे दाखल होते़. तर २०१६ मध्ये ३६९ गुन्हे दाखल होते़. २०१७ मध्ये विनयभंगाच्या ६९९ गुन्हे दाखल झाले होते़. २०१६ मध्ये ६६२ गुन्हे नोंदविण्यात आले होते़. * राज्यातील एकूण दखलपात्र गुन्ह्यांपैकी ५४ टक्के गुन्हे हे महिलांविरुद्ध झालेले असतात़. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMolestationविनयभंगArrestअटक