पिंपरी : महाराष्ट्रात घडणाऱ्या घटनेच्या अन्यायाविरोधात लढण्यासाठी अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने दसऱ्यानिमित्त महिलांनी पारंपरिक शस्त्रपूजन रद्द करून शस्त्र हाती घेतले़ दसऱ्यानिमित्त जिल्ह्यातील अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने प्रत्येक शाखेमध्ये महिलांच्या हातामध्ये तलवार देण्यात आली़ गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील अत्याचारात वाढ झाली, तरी सरकार बलात्कारीत घटनेकडे गांभिर्यांने पाहत नाही़ त्यामुळे अशा घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यावर जरब बसविण्यासाठी संघटनेच्यावतीने दसऱ्याच्या सणाला शस्त्रांचे पुजन न करता ते शस्त्र महिलांच्या हाती देण्यात आले होते़.दसऱ्यानंतर विविध ठिकाणच्या संघटनेच्या शाखेत तलवारींचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष आबा पाटील यांनी दिली आहे़ या कार्यक्रमात बोलताना पाटील यांनी महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था सुरळित पार पाडण्यासाठी महिलांनी हाती शस्त्र घेतले पाहिजे़ त्यामुळे छावा संघटनेच्यावतीने महिलांच्या हाती तलवार देऊन उपेक्षितांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. (प्रतिनिधी)
शस्त्रपूजनाऐवजी महिलांच्या हाती शस्त्र
By admin | Published: October 12, 2016 1:43 AM