पुणे : दुबईहून आलेल्या विमानातून शरीराच्या आतमध्ये सोने घेऊन येणाऱ्या चार सुदानी महिलांकडून विमानतळ सीमा शुल्क अधिकाºयांनी २ किलो तस्करी केलेल्या सोने जप्त केले आहे़ त्याची बाजारभावानुसार ६६ लाख ५० हजार ७७९ रुपये इतकी किंमत आहे़ पुणे विमानतळावर शरीराच्या आतमध्ये लपवून आणलेले व एकाच वेळी चार महिलांना पकडण्याची ही पहिलीच वेळ आहे़
खवला इलाहाडी अहमद अमारा, मावाहिब मस्री अहमद एडम, सल्मा सलाह मोहम्मद अहमद यासीन आणि मनाल एल्तायब अब्ददा मोहम्मद अशी त्यांची नावे आहेत़ या सर्व ३५ ते ४५ वयोगटातील सुदानी महिला आहेत़ त्या दुबईहून आलेल्या स्पाईस जेट विमानाने पुण्यात बुधवारी सकाळी उतरल्या़ ग्रीन चॅनेलमधून जात असताना त्यांच्या अंगावर सोने असल्याचा सिग्नल स्कॅनरने दिला़ त्यानंतर त्यांनी अंगावरील सर्व सोने व इतर धातूंचे दागिने काढून ठेवायला सांगितले़ त्यानंतरही स्कॅनरचा सिग्नल येत असल्याने त्यांची महिला अधिकाºयांनी तपासणी केली़ तेव्हा सोने गुदद्वारावाटे शरीरात ठेवले असल्याचे आढळून आले़ त्यानंतर त्यांना ससून रुग्णालयात नेण्यात आले़ तेथे त्यांच्या शरीरातून हे सोने बाहेर काढण्यात आले़ पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उपायुक्त के़ आर रामाराव, हर्षल मेटे व त्यांच्या सहकाºयांनी हा प्रकार उघडकीस आणला़