बारामती : घरफोडी करणारी महिलांची टोळी बारामती पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने जेरबंद केली आहे. या प्रकरणी बारामती शहरातील तीन महिलांना पोलिसांनी अटक केली असून, एक महिला फरार झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये या महिलांची टोळी कैद झाली. होती. बारामती परिसरात घरफोडी करणारी टोळी प्रथमच आढळली आहे. त्यामुळे घरफोडी करणारी महिलांची टोळी बारामतीमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. मिना उर्फ सारीका लाला भाले (वय ३५),लक्ष्मी राहुल गायकवाड, पल्लवी विशाल कांबळे (वय २१, रा. आमराई, बारामती) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. चौकशीत या महिला आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. तसेच गुन्हा करताना दुर्गा आकाश साळुंके (तिघी रा. आमराई, बारामती) हि महिला असल्याची कबुली दिली असून ती सध्या फरार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती एमआयडीसीतील सुभद्रा मॉल येथील गाळा क्रमांक ५५ मधील ब्रँडेड कंपनीचे प्लंबिंगचे ५० हजार रुपये किंंमतीचे साहित्य या महिलांनी घरफोडी करुन चोरुन नेले होते. यााबाबत अतिरिक्त पोलीस अधिक्षक डॉ. संदीप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगांवकर यांनी तपास करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार बारामती तालुका पोलिसांनी गुन्हा घडतानाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. यामध्ये महिला चोरी करताना दिसून आल्या. या महिलांची पोलिसांनी गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळविली. त्यानंतर आरोपी महिलांना जेरबंद करण्यात आले. पथकाचे प्रमुख चंद्रशेखर यादव यांच्यासह त्यांच्या पथकाने ही टोळी जेरबंद केली.
घरफोडी करणारी महिलांची टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 4:23 PM
बारामती परिसरात घरफोडी करणारी टोळी प्रथमच आढळली आहे. त्यामुळे घरफोडी करणारी महिलांची टोळी बारामतीमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.
ठळक मुद्देसीसीटीव्ही फुटेजमध्ये महिला चोरी करताना निदर्शनास