शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
3
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
4
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
5
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
6
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
7
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
8
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
9
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
10
IND vs SA: फ्लॉप शोचा सिलसिला संपला! Abhishek Sharma नं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा
11
BJP च्या विजयासाठी RSS ने आखली योजना; प्रत्येक मतदारसंघासाठी बनवला 1-2-3 चा फॉर्म्युला
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

शेवटी 'आई'ने ती लढाई जिंकलीच! अन् व्हेंटिलेटरवर असणाऱ्या कोरोनाबाधित महिलेच्या पोटी नन्ही 'परी' जन्मली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 4:05 PM

४५ दिवसांच्या उपचारानंतर महिला कोरोनामुक्त होवुन तिची प्रकृती देखील चांगली झाली आहे. तसेच बाळ देखील सुखरुप आहे.

बारामती : शेवटी ‘आई ती आईच’ असते.तिची जागा कोणीच घेवु शकत नाही. आईची व्याख्या अधोरेखित करणारी अनोखी घटना बारामतीत घडली आहे. फुफ्फुसात १०० टक्के संसर्ग झालेल्या कोरोनाबाधित गर्भवती महिलेने तत्पर उपचार आणि तीव्र इच्छाशक्तीच्या बळावर बाळाला सुखरुप जन्म दिला आहे.डॉक्टरांनी व्हेंटीलेटरवर असलेल्या या मातेच्या मांडीवर नवजात बालकाला ठेवत तिचे मनोबल वाढविले.मनोबल वाढविण्यासाठी वापरलेली शक्कल महत्वपुर्ण ठरली आहे.

याबाबत डॉ. मेहता आणि डॉ. ढाके यांनी सांगितले, ६ एप्रिल रोजी गर्भारपणाचा ९ महिन्यांचा कालावधी पूर्ण झालेली २८ वर्षीय महिला रुग्णालयात दाखल झाली. ही महिला मूळची देऊळगाव राजे येथील शेतकरी कुटुंबातील असुन तिला ३ वर्षांची एक मुलगी आहे.तिचे संपुर्ण कुटुंब कोरोनाबाधित होते.या महिलेला देखील दाखल करताना कोविडमुळे ताप,खोकला,धाप लागणे असा त्रास होता.तसेच ऑक्सिजन पातळी ९० ते ९२ दरम्यान होती.दोन तीन दिवसांनी तिची ऑक्सिजन पातळी आणखी खालावली. कोविड मेडिकल मॅनेजमेंटनुसार तिच्यावर उपचार सुरु केले.या दरम्यान तिला ऑक्सिजनची गरज भासु लागली. १० एप्रिल रोजी ही महिला अत्यवस्थ झाली.तिला व्हेंंटिलेटरवर घेण्याची वेळ आली. महिलेचा एचआरसीटी स्कोअर २५ असल्याने अतिशय नाजुक अवस्था होती.रक्ताचे रिपोर्ट देखील चांगले नव्हते.त्यातच तिला प्रसुतीकळा सुरु झाल्या.मात्र, पहिले सिझर असल्याचे आता देखील सिझरच करणे गरजेचे होते.संध्याकाळी डॉक्टरांनी निर्णय घेत हि कोरोना संसर्गाचा धोका पत्करुन गुंतागुंतीची शस्त्रक्रिया पार पडली.व्हेंटीलेटर वर असणाºया या महिलेची सुखरुप प्रसुती झाली आहे,या महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. यावेळी महिलेने एका सुदृढ बालिकेला जन्म दिला.रुग्ण व्हेंटिलेटरवर असताना ही शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर बाळाला चिरायुच्या अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले.या बाळाची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.बाळाला जन्म दिल्यानंतर ती महिला १३ दिवस व्हेंंटिलेटरवर अतिदक्षता विभागात अत्यावस्थ होती. 

या दरम्यान रुग्णाचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आला.रुग्ण व्हेंटीलेटरवर असताना तिच्या मांडीवर बाळ दिले.त्यामुळे रुग्णाची जगण्याची इच्छा प्रबळ झाल्याचे डॉ मेहता यांनी सांगितले.कोरोनामुळे भयभीत होत खचणाऱ्या रुग्णांसमोर ही माता आदर्श ठरली आहे. येथील मेहता हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या पथकाने ही किमया साधली आहे.

 शहरातील फिजिशियन डॉ सुनील ढाके ,स्त्रीरोग तज्ञ डॉ विशाल मेहता, डॉ टेंगले,डॉ अुनराधा भोसले, भुलतज्ञ डॉ सुजित अडसुळ,डॉ.निकिता मेहता, बालरोगतज्ञ डॉ अमित कोकरे, होमिओपॅथी तज्ञ डॉ अमोल भगत ,डॉ हर्षा जाधव यांनी या महिलेवर यशस्वी उपचार केले .त्यासाठी केईएम हॉस्पिटलचे डॉ विवेक जोशी,डॉ हर्षवर्धन व्होरा,डॉ शुभांगी वाघमोडे, डॉ आनंद गवसणे यांचा सल्ला व मार्गदर्शन महत्वाचा ठरल्याचे डॉक्टरांनी पत्रकारांशी  बोलताना सांगितले.

४५ दिवसांच्या उपचारानंतर ती महिला कोरोनामुक्त होवुन प्रकृती चांगली झाली आहे.तिचे बाळ देखील सुखरुप आहे.रुग्णालयात सर्वच आजारातील अत्यवस्थ गर्भवतींच्या प्रसुतीसाठी असणारे ‘हाय रिस्क ऑबेस्टेट्रीक युनिट’ यावेळी उपयुक्त ठरले.  कोरोनाबाधित महिला आणि तिच्या बाळाला चांगले उपचार देवु शकल्याने त्यांच्या जीवावर बेतणारा धोका टळला,याचे मनापासुन समाधान आहे. रुग्णांच्या नातेवाईकांचे सहकार्य मोलाचे ठरल्याचे डॉ.विशाल  मेहता म्हणाले.———————————

टॅग्स :BaramatiबारामतीMothers Dayमदर्स डेpregnant womanगर्भवती महिलाcorona virusकोरोना वायरस बातम्या