शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

Women's Health : महिलांनो सावधान...! पीसीओडी/ पीसीओएसचे वेळीच उपचार घ्या, अन्यथा वंध्यत्वाचा धोका अधिक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 2:14 PM

Women Health : १६ ते २० वयोगटातील मुलींमध्ये पीसीओडी/ पीसीओएसचे प्रमाण अधिक

पुणे : सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे पॉलिसिस्टिक ओव्हरी डिसीज (पीसीओडी) आणि पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) या विकारांचे प्रमाण महाविद्यालयीन तरुणींमध्ये झपाट्याने वाढत आहे. विशेषतः १६ ते २० वयोगटातील मुली तसेच रात्रपाळीत काम करणाऱ्या महिलांमध्ये हे विकार मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. वेळीच उपचार न घेतल्यास भविष्यात वंध्यत्वाचा धोका निर्माण होऊ शकतो, असे स्त्रीरोगतज्ज्ञांनी सांगितले.सध्या तरुणींसह महिलांमध्येपीसीओडी / पीसीओएस या गंभीर समस्या जाणवू लागल्या आहेत. दैनंदिन जीवनशैलीतील होत असलेल्या बदलामुळे पीसीओडी/ पीसीओएस वाढतच चालला आहे त्यासोबतच विशेष रात्रपाळीत काम करत असलेल्या महिलांमध्ये पीसीओडी, पीसीओएसची लक्षणे मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत.पुण्यात पीसीओडी, पीसीओएस विकाराची संख्या एकंदरित स्थितीनुसार ९ टक्के ते २२ टक्क्यांपर्यंत आहे. दर ५० मुलीमागे दहा मुलींमध्ये पीसीओडी, पीसीओएसची लक्षणे आढळत आहेत, ज्यामध्ये शहरी भागातील प्रमाण तुलनेत अधिक आहे. पुणे शहरातील स्त्रियांची बदलती जीवनशैली तसेच मानसिक ताणतणाव आणि स्थूलतेमुळे पीसीओडी, पीसीओएसच्या विकाराच्या केसेस मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. अशा प्रकारच्या समस्या उद्भवल्यामुळे गर्भधारणा होण्यासाठी अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे पुण्यात मोठ्या प्रमाणात आयव्हीएफच्या उपचाराची मागणीदेखील वाढल्याचे स्त्रीरोगतज्ज्ञांनी सांगितले.-लक्षणे* वंध्यत्वाशी संबंधित हार्मोनल असमतोलामुळे त्वचेवर मुरूम, चेहऱ्यावर किंवा शरीरावर अधिक केस येणे* योनी भागात सतत वेदना असणे.* लैंगिक संबंधांमध्ये वेदना होणे.*वजन झपाट्याने वाढणे किंवा कमी होणे.* केस गळणे किंवा त्वचेमध्ये बदल होणे.* थकवा, नैराश्य किंवा मूड स्विंग्स होणे.* पाळीदरम्यान अधिक रक्तस्राव किंवा खूप कमी रक्तस्राव हाेणे.* पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओस), थायरॉईड विकार किंवा प्रोलॅक्टिनचे असंतुलन असणे. साधारण महाविद्यालयीन मुली बाहेरील खाद्यपदार्थांचे सेवन अधिक प्रमाणात करतात, ज्यामुळे शरीरावर विशेष काही परिणाम होत असतात. त्यासोबतच ताण, अनियमित झोप या सगळ्यांमुळेसुद्धा आरोग्यावर परिणाम होत असतो. मासिक पाळीची समस्या अधिक काळापासून असेल तर मुलींमध्ये वंध्यत्वाचे प्रमाण वाढू शकते. महिलांनी दररोज ४५ मिनिटे व्यायाम न चुकता केलाच पाहिजे.- योगेश गाडेकर, स्त्रीरोगतज्ज्ञ

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रWomenमहिलाpcodपीसीओडीpcosपीसीओएस आणि पीसीओडीHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स