वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ, पर्यवेक्षिका मंगल मुळे, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील खोडदच्या सरपंच सविता गायकवाड, वारूळवाडीच्या उपसरपंच माया डोंगरे , मांजरवाडीच्या सरपंच मनीषा मुळे, गुंजाळवाडीच्या सरपंच रेश्मा वायकर, आर्वीच्या सरपंच वंदना गाढवे, उद्योजिका पुष्पा आरोटे, वनपाल सारिका हांडे, ग्रा.पं. सदस्या स्नेहल कांकरिया ,शिक्षण क्षेत्रातील वैशाली फुलसुंदर या महिलांचा विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
याप्रसंगी रोटरी क्लब नारायणगाव हायवेचे अध्यक्ष अंबादास वामन, ॲड. राम भालेराव , बाळासाहेब गिलबिले, डॉ. शिवाजी टाकळकर, डॉ. श्रीकांत फुलसुंदर, शामराव थोरात ,सुकाजी मुळे, शिक्षणतज्ञ रामभाऊ सातपुते, अतुल कांकरिया, नारायण आरोटे, नंदकुमार चिंचकर, रवींद्र वाजगे ,शिवाजी कुमकर, मनीषा वामन, उषा टाकळकर, ऊर्मिला वाजगे, सोनल भालेराव, सोनाली आरोटे, मनीषा मुळे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रास्तविक वैशाली फुलसुंदर तर सूत्रसंचालन सीमा कुमकर यांनी केले. रोहिणी गिलबिले यांनी आभार मानले.
११नारायणगाव महिला सन्मान
रोटरी क्लब नारायणगाव हायवेच्या वतीने विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला.