पुणे (लोणी काळभोर) : माहेरुन तीन तोळे सोन्याचे दागिने घेऊन येत नाही, लग्नात मानपान केला नाही म्हणून सुनेला शिवीगाळ, मारहाण, दमदाटी करून शारीरिक व मानसिक छळ करून तिला शिळे अन्न खायला देणा-या पती, सासू व सास-या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी मधुरिमा छन्नुसिंग सरनोबत ( वय २४, सध्या रा. ऊरूळी कांचन, हरजीवन हॉस्पिटल शेजारी, ता. हवेली. मुळ रा. हरिओम नगर, नवी गल्ली, कोल्हापूर ) या विवाहितेने दिलेल्या फिर्यादी वरून पती छन्नुसिंग विलासराव सरनोबत, सासरा विलासराव बाबुराव सरनोबत व सासू वसुधा विलासराव सरनोबत ( तिघेही रा. हरिओम नगर, नवी गल्ली, कोल्हापूर, मुळ गाव तिरपण, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर ) यांच्या विरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १७ जून २०१७ रोजी मधुरिमा व छन्नुसिंग यांचा विवाह कोल्हापुर येथे झाला. दोन महिने तिला व्यवस्थित नांदवण्यात आले. त्या नंतर वेगवेगळ्या कारणांसाठी तिचा शारीरिक, मानसिक छळ सुरू झाला आम्हाला इंजिनिअर मुलगी सुन म्हणून हवी होती आमची चुक झाली. तिने सदर बाब पतीला सांगितली त्यानेही आई - वडील खरेे बोलत असल्याचे सांगितले. नोव्हेंबर २०१७ मध्ये
दिवाळी सणासाठी माहेरी ऊरूळी कांचन येथें आली त्यावेळी तिने वडिलांना सदर बाब सांगितली होती. सण झालेनंतर ती आई, वडील व भाऊ यांना घेऊन सासरी गेली तिचे वडीलांनी तिचे पती, सासू, सासरे यांना समजावून सांगीतले. त्यावेळी त्यांनी यापुढे त्रास देणार नाही असे सांगितले होते. त्यानंतर मात्र माहेरी सांगितले या कारणांवरून तिला मारहाण करण्यात आली. व नेहमी शिवीगाळ होत होती.
मे २०१८ मधील आधिक मासात आई वडील मधुरिमाला न्यायला आले नाहीत म्हणून पतीने मारहाण केली होती. तिने सांगितले नंतर वडील व भाऊ तिला नेण्यास आले त्यावेळी त्यांच्यासमोर तुला आम्ही नांदवणार नाही असे सांगितले. ती माहेरी गेल्यावर पतीने फोन करून नांदायचं असेल तर माहेराहून तीन तोळे सोन्याचे दागिने घेऊन ये. नाही आणले तर नांदायला येऊ नकोस. असे सांगितले होते.
२ ऑगस्ट २०१८ आई वडिल तीला सासरी घेऊन गेले घेऊन गेले त्यावेळी तिच्या घराला कुलूप होते. वडीलांनी तिचे पती व सासरे यांना फोन केला त्यावेळी त्यांनी मुलाला घेवून जा आम्ही नांदवणार नाही. असे सांगितले होते. महिला समुपदेशन केंद्रात जाऊन आल्या नंतर ही तिचा शारीरिक, मानसिक छळ बंद झाला नाही. छोट्या मोठ्या कारणांमुळे तिला मारहाण, शिवीगाळ, घालून पाडून बोलणे हा छळ बंंद झाला नाही. मधुरिमा, तिचे आई वडील यांनी सासरच्यांना अनेेक वेळा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु काहीही फरक पडला नाही. म्हणून मधुुुुरिमाने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.