पुणे: पुण्यात पिंक इ रिक्षा चावी वाटपाचा कार्यक्रम उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते पार पडला. यावेळी अजितदादांनी महिलांच्या सुरक्षेबाबत रिक्षा चालवताना काही सूचना दिल्या आहेत. रिक्षामध्ये जर कुणी पुरुष बसला तर त्याचा फोटो काढून ठेवा असा सल्ला अजितदादांनी या कार्यक्रमात महिलांना दिला आहे.
अजित पवार म्हणाले, आज पिंक इ रिक्षा वाटपाचा कार्यक्रम पार पडत आहे. आजचा कार्यक्रम महत्वाचा असून राज्याचे सामाजिक परिवर्तन घडवणारा आहे. महिला आणि बालकांसाठी नरेंद्र मोदी अनेक योजना राबवत आहे. राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देखील अनेक योजना आम्ही राबवत आहोत. 80 कोटी रुपये पहिल्यांदा मी या कामासाठी मंजूर केले होते. विधानसभा निवडणुकीच्या आधी आम्हाला ही योजना राबवायची होती. चांगल्या कंपनीकडून आम्ही या रिक्षा घ्यायच ठरवलं होतं. आज महिलांना या रिक्षाच्या चाव्या दिल्या आहेत. ही योजना महिलाना ठोस अशा प्रकारचा प्रेरणादायी कार्यक्रम देण्याची आहे. आम्हाला महिलांना सक्षम आणि बळकट करायच आहे. महिला सबलीकरण करायच आहे
महिला आणि मुलींनी रिक्षाने जाताना या पिंक रिक्षाचा विचार करावा. तुम्ही जर पुरुषाला रिक्षामध्ये बसवलं. तर त्याचा फोटो काढायचा आणि तुमच्या घरी पाठवून द्यायचा की, आता मी या ग्राहकाला घेऊन चालले आहे. जर त्या ग्राहकांनी काय गडबड केली तर त्याचा पुरावा आपल्याकडे राहील. आम्ही सगळे पुरुष गडबड करणारे नाहीत परंतु काही वेगळ्या विचारांचे लोक असतात. काही लोक विकृत असतात. पुरुषांना सांगायचं भावा तू माझ्याकडे बसला आहेस. तुझी आठवण म्हणून फोटो काढत असून हे गरजेचं आह. या योजनेतून आम्ही महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणायचं काम आम्ही करत आहोत.
लाडकी बहीण योजना बंद होणार नाही
राज्यात लाडक्या बहिणी विधानसभेला आमच्या पाठीशी विश्वासाने उभ्या राहिल्या आहेत. आम्हाला खूप मोठा पाठिंबा मिळाला आहे. आम्ही महिलांच्या पाठीमागे मजबुतीने उभं आहोत. अनेकजण आमच्यावर आरोप करतात की, उद्याच्या काळात आमचे हे सगळे कार्यक्रम बंद पडतील. लाडक्या बहिणीचा निधी देणार नाहीत. पण मी आज सगळ्यांना सांगतो की, राज्य सरकारने जी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. तो महिलांच्या सन्मानासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये ज्या महिला त्याला लाभामध्ये बसतात त्या महिलांना कधीही हा निधी बंद होऊ देणार नाही. कुणाला काय अफवा उठवायच्या आहेत ते उठवू द्या ही योजना बंद होणार नाही. लोकसभेच्या वेळी देखील अफवा उठवली गेले की, हे संविधान बदलतील पण असं नव्हतं आपल संविधान जगात श्रेष्ठ आहे. अस संविधान आम्ही बदलणार नसल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे.