पुणे : राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने महागाईच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या जनजागर यात्रेला शरद पवार यांच्या हस्ते बुधवारी सायंकाळी झेंडा दाखवण्यात आला. महिला धोरण तसेच राजकीय आरक्षण व अन्य निर्णय घेतल्याबद्दल कृतज्ञता म्हणून महिला काँग्रेसच्या वतीने पवार यांचा फुले पगडी, घोंगडी व काठी देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सुप्रिया सुळे यांनी राजकारणातील खंत व्यक्त केली आहे. राजकारणातील महिलांबाबत सध्या अत्यंत वाईट बोलल जातंय असं त्या म्हणाल्या आहेत.
महिलांबाबत वाईट बोलण्याबाबत कोणीही मागे नाही. एक बोलतो लगेच दुसरा त्याच्यापुढचे बोलतो. हे सगळे उबग आणणारे आहे. हे असेच सुरू राहिले तर भविष्यात कोणाच्याही घरचे आपल्या घरातील महिलेला राजकारणात प्रवेश करू देणार नाहीत. त्यामुळे आपण आज निर्धार करू की आपला पक्ष कोणत्याही महिलेबाबत कधीही वाईट उद्गार काढणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसनेच असे धोरण ठरवायला हवी अशी मागणी मी अध्यक्षांकडे करते आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसने याबाबतीत पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
विद्या चव्हाण यांनी कोणी काय घालायचे, कोणावर प्रेम करायचे, कोणाबरोबर लग्न करायचे हे सरकार सांगू लागले आहे. त्यांना थांबविण्यासाठी आपण आता यात्रेच्या माध्यमातून रस्त्यावरची लढाई सुरू करतो आहे असे सांगितले.