टाकळी हाजी (ता. शिरूर) येथे राज्यांचे गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील व माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या प्रयत्नांमधून मळगंगादेवी पर्यटन व तीर्थक्षेत्रावर शंभर बेडचे सेंटर सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी नागपंचमीनिमित्ताने येथील महिला रुग्णांना सोबत घेऊन आरोग्यसेविका सुवर्णा थोपटे व प्रियांका लंके यांनी वारुळाचे पूजन केले.
त्याबाबत सुवर्णा थोपटे म्हणाल्या की, अनेक रुग्ण कोविड झाल्यामुळे मानसिक तणावात असतात. मात्र आम्ही त्यांना तणावमुक्त करण्यासाठी असे विविध उपक्रम राबवितो. त्यामुळे रुग्ण लवकर बरे होतात. वटसावित्रीच्या दिवशी आम्ही वडाचे झाड लावून वटपौर्णिमा साजरी केली होती.
---फोटो क्रमांक : १३टाकळी हाजी नागपंचमी साजरी
फोटो : नागपंचमी साजरी करताना टाकळी हाजी येथील मळगंगादेवी कोविड सेंटरमधील महिला.
130821\img_20210813_113238.jpg
मळगंगा कोविड सेंटर मधील महीला नागपंचमी साजरी करताना