टाकळी हाजी : शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात सुमन पुरुषोत्तम चोरे थोडक्यात बचावल्या आहे. सुमन यांचा जीव त्यांच्या शेळीने वाचवला. मात्र, बिबट्यांच्या भीतीने मुले व महिलांमधे प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.सुमन चोरे ह्या बुधवारी (दि.१८) घोडेवस्ती येथे आपल्या दहा ते पंधरा शेळ्या घेवून रानात गेल्या होत्या . त्यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक सुमन यांच्यावर हल्ला केला. घाबरलेल्या अवस्थेत सुमन यांचा साडीचा पदर बिबट्याच्या तोंडात येताच त्या बाजूला सरकल्या. या बिबट्याच्या हल्ल्याने शेळ्या घाबरून पळाल्या. मात्र, बिबट्याने एका शेळीला तोंडात धरून तेथून पलायन केले. थोडक्यात सुमन यांचा जीव त्यांच्या शेळीने वाचवला.ही घटना भरदिवसा दुपारच्यावेळी घडली.वनविभागाने तात्काळ पिंजरा लावण्याची व्यवस्था करावी असे आवाहन घोडगंगा कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे व टाकळी हाजीचे सरपंच दामू घोडे यांनी वनविभागाकडे केली आहे.
शिरूर तालुक्यात एका शेळीमुळे वाचला महिलेचा जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 8:59 PM